Homeताज्या बातम्यादेश

ऑटोग्राफनंतर एमएस धोनीने चाहत्याकडून मागितले चॉकलेट

भारताचा माजी कर्णधार आणि दिग्गज यष्टीरक्षक महेंद्र सिंह धोनी आपल्या संयमी खेळ आणि विजेच्या गतीने केल्या गेलेल्या स्टंपिंगसाठी जगविख्यात आहे. धोनी

बोगस क्रीडा प्रमाणपत्राआधारे 109 जणांनी लाटली सरकारी नोकरी
भारतीय संघाला पाकिस्तान संघाबरोबर झालेला पराभव विसरावा लागेल.
वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियासाठी गुड न्यूज !

भारताचा माजी कर्णधार आणि दिग्गज यष्टीरक्षक महेंद्र सिंह धोनी आपल्या संयमी खेळ आणि विजेच्या गतीने केल्या गेलेल्या स्टंपिंगसाठी जगविख्यात आहे. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती घेतलीये. मात्र, तो इंडियन प्रीमिअर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी खेळत आहे. तो पुढच्या हंगामातही पिवळ्या जर्सी चाहत्यांना खेळताना दिसणार आहे. धोनीचा चाहतावर्ग भारतातच नव्हे तर जगभरात पसरलेला आहे. धोनीची एक झलक बघण्यासाठी चाहते सामन्यांच्या आधीचे सराव सत्र देखील बघायला जातात. अशातच, महेंद्र सिंह धोनी आणि त्याला भेटायला आलेल्या चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये धोनी आणि त्याच्या चाहत्याचा मजेशीर किस्सा कैद झालाय. महेंद्र सिंह धोनीला त्याचा एक चाहता भेटायला आला. त्याने धोनीला छोट्या बॅटवर ऑटोग्राफ देण्याची विनंती केली. धोनी आपल्या हातातील चॉकलेटचा बॉक्स सही करेपर्यंत चाहत्याच्या हातात देतो. दोन्ही बॅटवर सही केल्यानंतर चाहता आपल्या मार्गावर निघाला होता. मात्र, धोनीने त्याला सही करण्याच्या आधी दिलेले चॉकलेट परत मागितले. या प्रसंगानंतर एकच हशा पिकला. हा व्हिडीओ जेव्हा इंस्टाग्रामवर व्हायरल झाला तेव्हा, चाहत्यांना याला भरभरून प्रतिसाद दिला. कमेंट बॉक्समध्ये कमेंट्सचा पाऊस पडला होता. युझर्सने कंमेंट बॉक्समध्ये सामंजस्यही दाखवलं. चाहते म्हणाले की, “त्याच्या घरी एक गोंडस मुलगी आहे. तिच्यासाठी घेऊन जात असेल.” महेंद्र सिंह धोनी सध्या इंडियन प्रीमिअर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्ज या संघाचं प्रतिनिधित्व करत आहे. त्याने मागच्या वर्षी सीएसके संघाला जेतेपदही मिळवून दिलं होतं. यावेळी देखील त्याला विचारण्यात आले होते की ही तुझी शेवटची स्पर्धा असणार आहे का? यावर धोनी म्हणाला होता की, चाहत्यांना वाटतय की मी खेळावं, त्यामुळे पुढच्या हंगामासाठी मी सराव सुरु ठेवेन.

COMMENTS