Homeताज्या बातम्या

इमारतीला लागलेल्या आगीत मुलीचा होरपळून मृत्यू

गुजरात राज्यातील अहमदाबाद शहरातील घटना

अहमदाबाद/वृत्तसंस्था : गुजरातच्या अहमदाबाद शहरातील शाहीबाग परिसरात एका इमारतीच्या सातव्या मजल्यावर शनिवारी भीषण आग लागली. या अपघातात एका मुलीचा

मुंबईतील रस्त्यांवरील पांढऱ्या पट्ट्यांच्या वादात मनसेची उडी; दादरमध्ये रंगवलेले पट्टे हटवण्याची महानगरपालिकेची मोहीम
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सार्ध शताब्दी वर्षानिमित्त केवडिया येथे महाराष्ट्राचा चित्ररथ
शरद पवार-ठाकरे यांच्यात अडीच तास चर्चा ; अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर रणनीती

अहमदाबाद/वृत्तसंस्था : गुजरातच्या अहमदाबाद शहरातील शाहीबाग परिसरात एका इमारतीच्या सातव्या मजल्यावर शनिवारी भीषण आग लागली. या अपघातात एका मुलीचा होरपळून मृत्यू झाला असून अनेक लोक अडकले आहेत. यादरम्यान अनेक लोक जीव वाचवण्याची आतून मदतीसाठी आरडा ओरडा करताना दिसले.
अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 11 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आगीमुळे 15 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. घरातील इतर सदस्य घरी उपस्थित नव्हते. आग कशामुळे लागली हे देखील स्पष्ट झालेले नाही. काही लोक वरच्या मजल्यावर अडकले आहेत. दरम्यान, या भीषण आगीचे काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. सातव्या मजल्यावरील गॅलरीत एक व्यक्ती आगीत अडकलेले दिसत आहे.

COMMENTS