श्रीक्षेत्र वाहिरा येथे भव्य 101 फूट उंच श्वेतध्वज भूमीपुजन सोहळा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीक्षेत्र वाहिरा येथे भव्य 101 फूट उंच श्वेतध्वज भूमीपुजन सोहळा

आष्टी (प्रतिनिधी)  तालुक्यातील वाहिरा येथे शनिवार दि. 16 रोजी सकाळी 7 वाजता भव्य 101 पांढरा ध्वजाचे भूमीपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. य

पहाटे पहाटे मला जाग आली…; काँग्रेस शहराध्यक्षांच्या गझलेला रसिकांची टाळ्यांची दाद
तलाठी परीक्षेतील गोंधळाची एसआयटी चौकशी करा
राहाता शहरात महात्मा फुले यांचा स्मृतिदिन उत्साहात  

आष्टी (प्रतिनिधी) 

तालुक्यातील वाहिरा येथे शनिवार दि. 16 रोजी सकाळी 7 वाजता भव्य 101 पांढरा ध्वजाचे भूमीपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे अवाहन श्री संत शिरोमणी शेख महंमद महाराज प्रतिष्ठानने केले आहे.

ह.भ.प. जब्बर महाराज शेख, महंत ह.भ.प. दत्तगिरी महाराज, ह.भ.प. साहेबराव (दादा)  थोरवे  पंचक्रोशितील वारकरी सांप्रदायातील प्रवचनकार व किर्तनकार यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. यावेळी आमदार सुरेश धस, आमदार बाळासाहेब आजबे, माजी आमदार साहेबराव दरेकर, माजी आमदार भिमरावजी धोंडे, जिल्हा परिषद सदस्य सतिष शिंदे, सामाजिक कार्यकर्ते विजय गोल्हार, माजी जि.प.अध्यक्ष, शिवाजीराव राऊत, जिल्हा परिषद सदस्या सौ. शोभाताई उध्दव दरेकर, राष्ष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस बापूसाहेब डोकेे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष आण्णासाहेब चौधरी, माजी जि.प.सदस्य परमवीर पांडूळे, माजी जि प.सदस्य दत्तात्रेय वाडेकर, अंभोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रोहित बेंभरे, पंचायत समिती सदस्य परमेश्वर (काका) शेळके, पंचायत समिती सदस्य  बाबासाहेब गांगर्डे, युवा नेते धैर्यशिल थोरवे, पंचायत समिती सदस्या सौ. आलकाताई सुभाष वाळके, पंचायत समिती सदस्या सौ. मेघना दादासाहेब झांजे, बोरोडी गावचे सरपंच जयसिंग गव्हाणे आदींसह पंचक्रोशितील सरपंच व वारकरी कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.

संत शिरोमणी शेख महंमद महाराजांचा हा पांढरा ध्वज कायमस्वरूपी डौलाने फडकत रहावा. अशी असंख्य भाविकांची इच्छा आहे. म्हणून 101 फूट उंच ध्वज (श्वेत ध्वज) उभा करायचा प्रतिष्ठानचा मानस आहे या कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमास तन,मन,धनाने उपस्थित रहावे असे अवाहन संत शिरामणी शेख महंमद महाराज प्रतिष्ठानचे सचिव श्री. किसन आटोळे सर यांनी केले आहे.

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, या वारकरी परंपरेतील थोर संत म्हणजे वाहिरा येथील संत शेख महंमद महाराज होय… समता व शांततेचे प्रतिक असणारी पांढरी पताका (श्वेतध्वज) खांद्यावर घेवून वारकरी संप्रदायाचे विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य संत शेख महंमद महाराजांनी सोळाव्या शतकात केले.

सोळाव्या शतकात समाजात अंधश्रद्धा, अज्ञान, कर्मकांड आदींची पाळंमुळं घट्ट रोवली गेली होती. अशा काळात खांद्यावर पांढरा ध्वज घेऊन समाजाला शांततेचा, समतेचा, एकात्मतेचा संदेश महाराजांनी दिला. हा ध्वज महाराजांनी महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्राबाहेर फडकविला, वारकरी धर्म जागविला. दिशाहीन समाजाला दिशा दिली. हिंदू-मुस्लीमातील द्वैत नाहीसे करणारी महान विभूती म्हणून संत शेख महंमद महाराजांचा उल्लेख केला जातो. अभंग, कीर्तन प्रवचनातून भक्तीचा, ज्ञानाचा प्रचार-प्रसार केला. योगसंग्राम, पवनविजय, निष्कलंक प्रबोध, ज्ञानगंगा, साठी संवत्सर हे ग्रंथ लिहिले. अभंग, भारुड लिहिले. या साहित्यातून आजही जगण्यासाठी नवसंजीवनी मिळते. वाहिरा येथील समाधीच्या दर्शनाने सकारात्मक ऊर्जा मिळते. वाहिरा गावातून प्रतिवर्षी पंढरपूर, देहू ,आळंदी, पैठण, त्र्यंबकेश्वर, शिखर शिंगणापूर येथे दिंडी जाते. 

COMMENTS