Homeताज्या बातम्यादेश

पंजाबमध्ये कॅबिनेट मंत्री फौजा सिंग यांचा राजीनामा

चंदीगड : पंजाबचे कॅबिनेट मंत्री फौजा सिंग सरारी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सरारी हे स्वातंत्र्य सैनिक, संरक्षण सेवा कल्याण, अन्न प्रक्

अहमदनगर महापालिकेत भाजप-सेना नगरसेवक भिडले
राष्ट्रीय लोक अदालतीत एकूण 1 लाख 40 हजार दावे निकाली
प्राचार्य शंकरराव अनारसे यांचे  शब्दवैभव पुस्तक संस्कारशील

चंदीगड : पंजाबचे कॅबिनेट मंत्री फौजा सिंग सरारी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सरारी हे स्वातंत्र्य सैनिक, संरक्षण सेवा कल्याण, अन्न प्रक्रिया आणि फलोत्पादन विभाग हाताळत होते.
फौजा सिंग सरारी यांनी काही वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिला आहे. आपल्या पदाचा राजीनामा देताना त्यांनी आपण पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता असून निष्ठेने आपले काम करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. राजीनाम्यानंतर आता पंजाब मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार केला जाऊ शकतो आणि फौजा सिंग सरारी यांचा मंत्रिपद दुसर्‍या कोणाकडे सोपवला जाऊ शकतो. फौजा सिंग यांच्यावर यापूर्वी सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप होत होते आणि त्यांचा एक ऑडिओही व्हायरल झाला होता, हेही इथे नमूद करण्यासारखे आहे. त्यानंतर आम आदमी पार्टी (आप) सरकारवर विरोधकांनी जोरदार टीकास्त्र सोडले होते. यापार्श्‍वभूमीवर फौजा सिंह सरारींच्या राजीनाम्यामुळे नवीन चर्चा रंगली आहे.

COMMENTS