Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बर्दापूर येथे कृषी विभाग व महसूल विभाग यांच्या मार्फेत सोयाबीन पिक सर्वेक्षण

बर्दापूर प्रतिनिधी - अंबाजोगाई तालूक्यातील बर्दापूर येथे कृषी विभाग महसूल विभागा मार्फत सोमवार रोजी सोयाबीन पिक सर्वेक्षण करण्यात आले . बर्दापूर

मुश्रीफ यांना विनाकारण त्रास : सतेज पाटील यांची भाजपवर टीका
कविता ही हृदयाची भाषा ती जगता आली पाहिजे ः कवी प्रकाश घोडके
ताडोबा व्याघ्र प्रकल्पात तारू आणि पारस या दोन वाघांची झुंज 

बर्दापूर प्रतिनिधी – अंबाजोगाई तालूक्यातील बर्दापूर येथे कृषी विभाग महसूल विभागा मार्फत सोमवार रोजी सोयाबीन पिक सर्वेक्षण करण्यात आले . बर्दापूर येथे बर्‍याच दिवसा पासून या भागात पाऊस झालेला नाही पाऊस नसल्याने शेतकर्यांचे सोयाबीन पिक वाळत असून शेतकर्यांचे अतोनात नुकसान होत आहे ज्या शेतकर्‍याकडे पाण्याचे साधन आहे ते थोडेफार सोयाबीन पिकास पाणी देवून पिक वाचवण्याचा अतोनात प्रयत्न करत आहेत . पाऊस नसल्याने विहीरीला व  बोरवेलला पाणी नाही  थोडयाफार पाण्यावर  रात्रीचा दिवस करून थोडे थोडे पाणी देवून सोयाबीन पिक वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे .पावसाचा खंड पडल्यामुळे मौजे बर्दापुर येथे कृषी विभाग व महसूल विभाग यांचे मार्फत सोयाबीन पिक सर्वेक्षण करण्यात आले या वेळी बर्दापूर तलाठी सज्जाचे तलाठी एन बी गायकवाड साहेब कृषी सहाय्यक ए. एस शेख साहेब  बर्दापूरच्या सरपंच सौ अनिताताई विकास मोरे पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य तथा संघर्ष समिती  गजू पटेल लतीफ कुरेशी जिलानी हनुमंत  राजे  भिमराव मोरे पाटील विनोद गंडले यांनी गावातील शेतकर्‍यांच्या शेतात जावून सोयाबीन पिकाचे सर्वेक्षण केले. या वेळी रेवणसिद्ध हिरेमठ पंढरी घोडके शेख मोईन चाँदपाशा आनंत रामकृष्ण घोडके शेख अलीम नजीर वैजनाथ सोनवणे हे उपस्थित होते .

COMMENTS