माजलगाव : तीर्थक्षेत्र आरण येथे येत असलेल्या पंढरपूर येथील पांडुरंग पालखी सोहळ्यास राज्यातील तमाम भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,

माजलगाव : तीर्थक्षेत्र आरण येथे येत असलेल्या पंढरपूर येथील पांडुरंग पालखी सोहळ्यास राज्यातील तमाम भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन एकता परिषदेचे बीड जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर कोरडे यांनी केले आहे.
आरण येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री क्षेत्र पंढरपूर येथून पांडुरंगाची पालखी आरणला जात असते. यावर्षीही हा पालखी सोहळा आरण येथे जात असून दि. ८ ऑगस्ट रोजी पांडुरंगाच्या पालखीचे पंढरपूर येथून प्रस्थान होणार आहे. त्यानंतर दि. ९ ऑगस्ट रोजी या मार्गातील आष्टी येथे पालखीचा मुक्काम होईल. यानंतर दि. १० ऑगस्ट रोजी आरण येथे पालखीचा मुक्काम होईल. दि. ११ ऑगस्ट रोजी श्री संत शिरोमणी सावता महाराज यांचा संजीवनी समाधी सोहळा होईल व दि. १२ ऑगस्ट रोजी काल्याचे कीर्तन आणि त्यानंतर श्रीफळ हंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या कार्यक्रमास राज्यातील सावता महाराज यांच्या भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन एकता परिषदेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर कोरडे यांनी केले आहे.

COMMENTS