Homeताज्या बातम्या

मान्हेरे, शेंडी केंद्रांची संयुक्त शिक्षण परिषद उत्साहात

अकोले : तालुक्यातील मान्हेरे व शेंडी केंद्रांची संयुक्त केंद्रस्तरीय शिक्षण परिषद वाकी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उत्साहात पार पडली. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करून परिषदेच्या कामकाजाला सुरुवात करण्यात आली.परिषदेचे प्रमुख मार्गदर्शक खिरविरे बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर माळवे होते. गुरुपौर्णिमेनिमित्त केंद्रप्रमुख तुकाराम एरंडे यांचा दोन्ही केंद्रांच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.गुरुपौर्णिमेनिमित्त एरंडे यांनी उपस्थित शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. युवराज तळपे यांनी ‘पी.एम. ई-विद्या’ वाहिनीच्या वेळापत्रकाबाबत मार्गदर्शन केले. अर्जुन तळपाडे यांनी शिष्यवृत्ती परीक्षेच्या अनुषंगाने माहिती दिली.भागवत भांगरे यांनी केंद्र शासनाच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार शालेय व्यवस्थापन समितीची रचना व कार्य याबाबत सविस्तर माहिती दिली. भरत भांगरे (चिचोंडी) यांनी आधारकार्ड उपलब्ध नसलेल्या तसेच आधारकार्ड काढताना अडचणी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे आधारकार्ड सुलभ पद्धतीने कसे काढता येईल, याबाबत मार्गदर्शन केले. दीपक साळवे यांनी सुलभक म्हणून काम पाहिले.वाकी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक भीमा कोकतरे, यशोदा ढगे, हेमंत मुठे व अर्जुन तळपाडे यांच्या नियोजनाचे केंद्रप्रमुख तुकाराम एरंडे यांनी कौतुक केले.

दिव्यांगांना दिलासा; श्रीरामपूरमध्येच मिळणार प्रमाणपत्र; महिन्यातून दोनदा तपासणी व वितरणाची सुविधा; आ. काळे यांच्या पाठपुराव्याला यश
रविवारी मातंग समाजासाठी विद्यार्थी-पालक मार्गदर्शन शिबीर 
माजी खा. विखे यांचा अकोलेकरांकडून सन्मान  

COMMENTS