Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दारुच्या नशेत तरुण थेट रेल्वे रुळावर झोपला

जळगाव प्रतिनिधी -: सध्या सोशल मीडियाच्या डिजिटल युगामध्ये अनेक व्हिडिओ तुम्ही आजवर आपल्या मोबाईलच्या माध्यमातून पाहिले असतील. अनेक तरुण दारूच्या

संविधानाच्या रक्षणासाठी बसपा वचनबद्ध : डॉ. हुलगेश चलवादी
नांदेड शहरात सिग्नलच्या जवळ ग्रीन मॅट लावण्याची मागणी
सहकाराच्या तिजोरीवर राजकीय वारसदारांची नजर; नांदेड जिल्हा बँकेसाठी दिग्गजांची प्रतिष्ठा पणालाशेतकर्‍यांच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सत्तेसाठी राजकीय घराण्यांची मोर्चेबांधणी; 23 जागांसाठी 169 उमेदवार

जळगाव प्रतिनिधी -: सध्या सोशल मीडियाच्या डिजिटल युगामध्ये अनेक व्हिडिओ तुम्ही आजवर आपल्या मोबाईलच्या माध्यमातून पाहिले असतील. अनेक तरुण दारूच्या नशेत काय करतील काही सांगता येत नाही. अशीच एक घटना जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात पाळधी येथे घडली आहे. चक्क दारूच्या नशेत तरुण थेट रेल्वे ट्रॅकवर झोपून राहिला. त्यानंतर त्याच्यावरून मालगाडीचे तीन डबे गेल्यावर देखील या तरुणाला काहीच झाले नाही. अथवा कुठलीही दुखापत झाली नाही. तो या घटनेतून सुखरूप बचावला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील एकलग्न गावातील मच्छिंद्र गायकवाड हा तरुण दारूच्या नशेत दि. २९ रोजी दुपारच्या सुमारास पाळधी सोनवद रेल्वे गेट याठिकाणी पोहोचला. रेल्वे गेटमन दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण या ठिकाणी आत्महत्या करण्यासाठी आला होता. दारूच्या नशेत असल्याने याठिकाणी असलेल्या गेटमनला शंका आली. हा तरुण आत्महत्या करण्यासाठी आला असावा, म्हणून गेटमनने तरुणाला हाकलले. पण हा तरुण जायचे नाव घेत नव्हता. दरम्यान त्याचवेळी एक सुपरफास्ट रेल्वे गाडी या ठिकाणाहून गेली. त्यामुळे सुदैवाने गेटमनच्या समय सुचकतेमुळे त्याचे प्राण वाचले. हा तरुण काही वेळाने तिथून निघून गेला. त्यानंतर पुन्हा मालगाडी येत असल्याचे पाहून रेल्वे गेटजवळ तरुण रेल्वे रुळाच्या मधोमध झोपून राहिला. यावेळी गेटमनने त्याला उठवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो उठला नाही. मालगाडी वेगात असल्याने त्या तरुणाच्या अंगावरून तीन मालगाडीचे डबे गेले. त्यानंतर गाडी थांबवून पुन्हा या तरुणाला बघितले असता सुदैवाने तरुण जिवंत होता. विशेष म्हणजे त्याला कुठलीही दुखापत झालेली नव्हती. त्यानंतर तरुणाला तिथून उचलून बाजूला नेण्यात आले.

COMMENTS