Homeताज्या बातम्या

प्रशासनाने वर्षभर गतिमान सेवा द्यावीआ. काळे ; ‘गतिमान नागरी सेवा पुरस्कारा’चा उद्देश साध्य करण्याचे आवाहन

कोपरगाव : नागरिकांच्या अडचणी वेळेत सोडविण्यासाठी प्रशासनाने वर्षभर गतिमान पद्धतीने काम करावे. केवळ शासकीय शिबिराच्या दिवशी सेवा देण्याऐवजी शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र व गरजू नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व विभागांनी सामूहिक प्रयत्न करावेत, असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून कोपरगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा गांधी प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टच्या सभागृहात झालेल्या या शिबिरात प्रशासकीय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना काळे बोलत होते.काळे म्हणाले, ‘‘अजित पवार हे शेतकरी आणि जनतेच्या प्रश्नांची जाण असलेले दूरदृष्टीचे नेतृत्व होते. शेती, दुग्ध व्यवसाय, पोल्ट्री, भाजीपाला, सहकार तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विविध घटकांचा त्यांचा सखोल अभ्यास होता. कामाच्या बाबतीत ते शिस्तप्रिय होते. नागरिकांचे प्रश्न वेळेत सोडविण्यासाठी प्रशासनानेही शिस्तबद्ध आणि गतिमान पद्धतीने काम करावे, अशी त्यांची अपेक्षा होती.’’अजित पवार यांच्या स्मरणार्थ राज्य शासनाने ‘गतिमान नागरी सेवा पुरस्कार’ जाहीर केला आहे. हा पुरस्कार मिळविण्याच्या उद्देशाने प्रत्येक विभागाने नागरिकांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी काम करावे, अशी अपेक्षा काळे यांनी व्यक्त केली. ‘‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराच्या माध्यमातून नागरिकांचे महसूलविषयक प्रश्न सोडविण्याचे काम सुरू आहे. मात्र, नागरिकांना गतिमान सेवा केवळ शिबिरापुरती मर्यादित न राहता वर्षभर मिळणे आवश्यक आहे. कोपरगाव मतदारसंघातील पात्र व गरजू नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत,’’ असेही काळे यांनी सांगितले.यावेळी अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, तहसीलदार महेश सावंत, कोपरगाव शहर पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे, गटविकास अधिकारी स्वप्निल वाळुंज, सहाय्यक गटविकास अधिकारी संदीप दळवी, नगरपरिषद मुख्याधिकारी अजित निकत, तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, वनपरिक्षेत्र अधिकारी महेबूब शेख, नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रवीण शिंदे, संचालक, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, लाभार्थी व नागरिक उपस्थित होते.

पीकेची रणनीती अंतिमतः भाजपेतर पक्षांना संपविणारी!
राज्यसभेसाठी नवनीत राणा यांची मोर्चेबांधणी; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची घेतली भेट
सचिन अहिर यांचा शिदेंच्या शिवसेनेत प्रवेशठाकरे गटाला धक्का; उपसभापती पदासाठी अर्ज दाखल

COMMENTS