Homeताज्या बातम्या

भिवंडीत चार मजली इमारत कोसळून ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू; पिलर दुरुस्ती सुरू असताना कोहिनूर अपार्टमेंट पत्त्यासारखे कोसळले

भिवंडी: भिवंडी शहरातील बालाजी नगर गंगारामवाडी परिसरातील 'कोहिनूर अपार्टमेंट' ही चार मजली इमारत ३० जुलै रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास अचान

निकषबाह्य इंग्रजी माध्यम शाळांवर कारवाईची मागणी; अन्यथा आंदोलनाचा इशारा – डॉ. रॅपनवाड
८०० बाल वारकर्‍यांचे नयनरम्य रिंगण, सहावीच्या चिमुकल्यांचे अभ्यासपूर्ण कीर्तन; माइलस्टोन स्कूलच्या मैदानावर अवतरली पंढरी!
देवळाली प्रवरा जिल्हा बँकेतील रोखपालच्या बदलीची मागणी; ग्राहकांना उद्धटपणाची वागणूक दिल्यास शाखेला टाळे ठोकण्याचा इशारा
Bhiwandi building collapse death toll rises to 41

भिवंडी: भिवंडी शहरातील बालाजी नगर गंगारामवाडी परिसरातील ‘कोहिनूर अपार्टमेंट’ ही चार मजली इमारत ३० जुलै रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास अचानक पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. या भीषण दुर्घटनेत ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ढिगाऱ्याखाली अजूनही काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तळमजल्यावरील पिलरच्या दुरुस्तीचे काम सुरू असतानाच ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

नेमके काय घडले?

कोहिनूर अपार्टमेंट ही इमारत १२ ते १४ वर्षे जुनी असून महापालिकेने तिला आधीच धोकादायक घोषित करून नोटीस बजावली होती. इमारतीची कामे अत्यंत कमकुवत असल्याने आणि एका विंगच्या तळमजल्यावरील पिलर नादुरुस्त झाल्याने मंगळवारी सायंकाळी सहा वाजेपासून पिलर दुरुस्तीचे काम सुरू होते. दुरुस्तीदरम्यान इमारतीला तडे जाण्यास सुरुवात झाली व रात्री आठ वाजता इमारत एका बाजूला झुकू लागली. पालिकेच्या प्रभाग समितीच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ धाव घेत इमारत खाली करण्याचे काम सुरू केले. मात्र, काही रहिवासी आपले साहित्य घेण्यासाठी पुन्हा इमारतीमध्ये गेले असतानाच संपूर्ण इमारत कोसळली.

अरुंद रस्त्यामुळे बचावकार्यात अडथळे

घटनेची माहिती मिळताच भिवंडी अग्निशमन दल, पोलीस आणि पालिका आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. मात्र, परिसरात जाण्यासाठी अरुंद रस्ता असल्याने सुरुवातीला अग्निशामक दलाच्या गाड्या पोहोचण्यात मोठे अडथळे आले. त्यानंतर एनडीआरएफ (NDRF) आणि टीडीआरएफच्या पथकांनी घटनास्थळी पोहोचून रस्त्यातील जुनी चाळ जेसीबीच्या साह्याने बाजूला केली आणि ढिगारा उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले. स्थानिक तरुणांनीही देवदूतासारखी धाव घेत काही जणांना ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढले.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून श्रद्धांजली

या दुर्घटनेवर शोक व्यक्त करताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, “भिवंडीतील कोहीनूर इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत निष्पाप नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी आहे. मृत नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. प्रशासनाकडून घटनास्थळी एनडीआरएफ व स्थानिक यंत्रणांच्या माध्यमातून युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरू असून बाधितांना सर्वतोपरी मदत पुरवली जाईल.”

COMMENTS