Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्र दिनानिमित्त घाटमाथ्यावर कुस्ती मैदान; पंचक्रोशी कुस्ती मंडळाचा निर्धार

घाटमाथा : नियोजित कुस्ती आखाड्याचे पूजन करताना ज्येष्ठ मल्ल सुरेश थोरात शेजारी पंचक्रोशी कुस्ती मंडळाचे सदस्य. औंध / वार्ताहर : अस्सल मर्दानी मराठ

दिल्ली येथील राष्ट्रीय तायक्वादो स्पर्धेत  लोह्याच्या वर्षा तोंडारेची कास्यपदाकाची कमाई
दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून दीपक चहरची माघार ?
बुद्धिबळ वर्ल्डकपमध्ये भारताचा डंका 

औंध / वार्ताहर : अस्सल मर्दानी मराठमोळा खेळ कुस्ती वाढली पाहिजे. मल्लांना मर्दुमकी दाखवण्यासाठी संधी मिळाली पाहिजे, यासाठी घाटमाथा, ता. खटाव येथे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून कुस्ती मैदान घेण्याचा निर्धार पंचक्रोशी कुस्ती मंडळाने केला आहे.
महाराष्ट्र दिनानिमित्त दरवर्षी घाटमाथा येथे कुस्ती मैदान सुरू करण्यासाठी पंचक्रोशीतील कुस्तीप्रेमींची बैठक नुकतीच औंध येथे पार पडली. यामध्ये देणगीदारांच्या माध्यमातून कुस्ती मैदान घेण्याचा निर्धार सर्वांनी केला. गटतट मतभेद बाजूला सारुन कुस्ती मैदानासाठी झोकून देऊन काम करण्याची तयारी उपस्थित कुस्तीप्रेमींनी व्यक्त केली.यावेळी कुस्ती मैदान घेण्यासाठी लागणार्‍या खर्चाचा आराखडा तयार करण्यात आला. तसेच मैदानासाठी आवश्यक पायाभूत सुविधा यावर देखील चर्चा करण्यात आली.
बैठकीस हिंद केसरी विकास जाधव, प्रकाश देशमुख, विष्णू शिंदे, प्रा. सुधाकर कुमकर, अमरशेठ देशमुख, वसंत जानकर, किसन आमले, मेजर हणमंत चव्हाण, विनोद थोरात, बाळू उमापे, सदाशिव इंगळे, दिनकर शिंगाडे, नाथा धोत्रे, विठ्ठल चव्हाण, अशोक सुर्यवंशी, भानुदास पवार, सी. आर. जाधव, राजेंद्र फडतरे, अशोक यादव, सचिन सुर्यवंशी, फिरोज मुलाणी, रशिद शेख, विष्णू जाधव, सागर गायकवाड, वैभव येवले, शंकर बिटले, किरण जाधव उपस्थित होते. फिरोज मुलाणी यांनी प्रास्ताविक केले. विकास जाधव यांनी आभार मानले.

COMMENTS