Homeताज्या बातम्या

साईनगरीत गुरुपौर्णिमेचा उत्साह; लाखो भाविकांची मांदियाळी, दोन दिवसांत १ कोटी ७० लाखांचे सुवर्णदान!

शिर्डी: गुरुपौर्णिमेनिमित्त साईनगरी शिर्डीत देशभरातून आलेल्या लाखो साईभक्तांच्या उपस्थितीने अत्यंत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध राज्

दादर आंदोलनात पोलिसाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग? विरोधकांचा तीव्र संताप; पोलिसांनी फेटाळले आरोप
मतपेटीपूर्वी पर्यटनाची मेजवानी; जिल्हा बँक निवडणुकीत मतदार ठरले ‘व्हीआयपी’
पाण्याचा घोट, हरिपाठाची भेट; दत्ता वाकसे यांची वारकर्‍यांना प्रेमाची साथ! मकरध्वज दिंडीला महाप्रसाद

शिर्डी: गुरुपौर्णिमेनिमित्त साईनगरी शिर्डीत देशभरातून आलेल्या लाखो साईभक्तांच्या उपस्थितीने अत्यंत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध राज्यांतून आलेल्या पालख्या शिर्डीत दाखल झाल्या असून, साईबाबा समाधी मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. संपूर्ण मंदिर परिसर आकर्षक फुलांची सजावट आणि नयनरम्य विद्युत रोषणाईने उजळून निघाला आहे.

गुरुपौर्णिमा हा गुरुपूजनाचा पवित्र दिवस मानला जात असल्याने, श्री साईबाबांना गुरुस्थानी मानणारे भक्त मोठ्या श्रद्धेने शिर्डीत दाखल झाले आहेत. श्री साईबाबा संस्थानच्या वतीने भक्तांच्या सोयीसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना व व्यवस्था करण्यात आल्या असून, मंदिर परिसरात दिवसभर भक्तांची मोठी वर्दळ पाहायला मिळाली.

दोन दिवसांत १ कोटी ७० लाखांचे सुवर्णदान

यंदाच्या गुरुपौर्णिमा उत्सवात साईंच्या चरणी भरभरून दान अर्पण करण्यात येत असून, सुवर्णदानाचा विक्रमी ओघ पाहायला मिळत आहे. गेल्या अवघ्या दोन दिवसांत साईबाबांच्या चरणी तब्बल १ कोटी ७० लाख रुपयांचे सुवर्णदान प्राप्त झाले आहे. मुंबई येथील एका साईभक्ताने आपली ओळख गुप्त ठेवत सुमारे ४७ लाख रुपये किमतीचा आणि ३०० ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार साईबाबांच्या चरणी अर्पण केला. अत्यंत आकर्षक रचना आणि सुंदर नक्षीकाम असलेला हा हार संस्थानकडे विधिवत सुपूर्द करण्यात आल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.

यापूर्वी गुरुपौर्णिमेच्या पहिल्या दिवशी ६४२ ग्रॅम वजनाचा आणि १ कोटी ३ लाख रुपये किमतीचा सोन्याचा मुकुट एका भक्ताकडून साईचरणी अर्पण करण्यात आला होता. त्यानंतर आता या ३०० ग्रॅमच्या सुवर्णहाराची भर पडल्याने शिर्डीत दानाचा मोठा ओघ सुरू आहे.

COMMENTS