Homeताज्या बातम्या

पाकव्याप्त काश्मीरमध्ये हाहाकार! महागाईविरोधात रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांवर पाकिस्तानी लष्कराचा थेट गोळीबार; ४० ठार, हजारो जखमी

इस्लामाबाद / नवी दिल्ली: पाकव्याप्त काश्मीरमध्ये (PoK) भीषण आणि धक्कादायक घटना घडली आहे. वाढती महागाई, विजेचे अफाट वाढलेले दर आणि मूलभूत सुविधांच

जनार्दन स्वामींच्या समाधीस्थानी गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन; बेट-कोपरगाव येथे धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल
शहीद जवानांच्या वारसांना शेतजमीन हस्तांतरणासाठी मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा
कार्यकर्ते उपेक्षित, वारसदार पुढे? भाजपमध्ये खदखद; खा. गोपछडेंच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह
500 ते 600 नागरिकांची लष्कराने गोळ्या झाडून केली हत्या, पाकव्याप्त काश्मीर  जळतोय, थेट तरुणाची धक्कादायक क्लिप.. - Marathi News | Major violence is  underway in ...

इस्लामाबाद / नवी दिल्ली: पाकव्याप्त काश्मीरमध्ये (PoK) भीषण आणि धक्कादायक घटना घडली आहे. वाढती महागाई, विजेचे अफाट वाढलेले दर आणि मूलभूत सुविधांचा अभाव याविरोधात गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांवर पाकिस्तानी लष्कर आणि सुरक्षा दलांनी थेट गोळीबार केला आहे. या अंधाधुंद गोळीबारात तब्बल ४० नागरिकांचा मृत्यू झाला असून, हजारो नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेचे हादरवून सोडणारे व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये सरकारविरोधात लोकांचा रोष प्रचंड वाढला असून नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आहेत. लोकांनी सुरू केलेला हा उठाव दडपण्यासाठी पाकिस्तानी लष्कराकडून नागरिकांवर अमानुष अत्याचार केले जात आहेत. गोळीबारानंतर या भागातील परिस्थिती अधिक चिघळली असून, संपूर्ण परिसरातील इंटरनेट सेवा आणि वीज पुरवठा पाकिस्तान सरकारने पूर्णपणे खंडित केला आहे, जेणेकरून तेथील अत्याचाराची माहिती बाहेर येऊ नये.

आपल्याच मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर लष्कराने केलेल्या या हिंसक कारवाईमुळे संपूर्ण पाकव्याप्त काश्मीरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. लोकांचा सरकारविरोधातील संताप शिगेला पोहोचला असून परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे.

‘द न्यूयॉर्क टाइम्स’च्या उल्लेखावर भारताचा तीव्र आक्षेप

दरम्यान, अमेरिकेतील प्रसिद्ध वृत्तपत्र ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ने या घटनेचे वृत्त देताना पाकव्याप्त काश्मीरचा उल्लेख ‘पाकिस्तानी काश्मीर’ (Pakistani Kashmir) असा केल्याबद्दल भारताने अत्यंत तीव्र आक्षेप नोंदवला आहे. अमेरिकेतील भारतीय दूतावासाने स्पष्ट शब्दांत बजावले आहे की, ही शब्दावली पूर्णपणे दिशाभूल करणारी आणि चुकीची आहे. ‘पाकिस्तानी काश्मीर’ नावाची कोणतीही संकल्पना किंवा भाग अस्तित्वात नसून तो भाग केवळ आणि केवळ ‘पाकव्याप्त काश्मीर’ (PoK) हाच आहे. पाकिस्तान सरकार तेथील नागरिकांवर करत असलेला छळ आणि अत्याचार जगापासून लपवण्यासाठी विविध प्रयत्न करत असल्याचे या घटनेवरून पुन्हा एकदा उघड झाले आहे.

COMMENTS