देवळाली प्रवरा : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राहुरी तालुक्यातील चिंचोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (भाटारकर वस्ती) येथे विद्यार्थ्यांना शालेय वस्तू, वह्या, पेन तसेच खाऊचे वाटप करण्यात आले.या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करून त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात आला. कार्यक्रमास शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन लाटे, शाखाप्रमुख कैलास लाटे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भारत लाटे, उपाध्यक्ष विनोद चोखर, माजी उपसरपंच विलास लाटे, संभाजी मकासरे, किरण ठोंबरे, मुख्याध्यापक हरिभाऊ आत्रे, मिलिंद आत्रे, मरभळ , पठारे , लखापती तसेच ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत नियमित अभ्यास, शिस्त आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रेरित केले. कार्यक्रमाचे आयोजन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या पुढाकारातून करण्यात आले असून, या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.

COMMENTS