Homeताज्या बातम्या

50 लाख शेतकर्‍यांना गटशेतीत आणण्याचा संकल्प : मुख्यमंत्री फडणवीस‘सत्यमेव जयते फार्मर कप 2026’ ही शेती परिवर्तनाची व्यापक जनचळवळ

मुंबई : ‘सत्यमेव जयते फार्मर कप 2026’ ही केवळ स्पर्धा नसून महाराष्ट्रातील शेती परिवर्तनाची व्यापक जनचळवळ आहे. या उपक्रमामुळे शेतकर्‍यांमध्ये निर्

महाबळेश्‍वरवाडी येथे वाळू वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरवर कारवाई
कोयना प्रकल्पग्रस्तांचे बेमुदत ठिय्या आंदोलन तात्पुरते स्थगित : डॉ. भारत पाटणकर
धनराज पवार यांचे पदवी परीक्षेत प्रथम श्रेणीत यश


मुंबई : ‘सत्यमेव जयते फार्मर कप 2026’ ही केवळ स्पर्धा नसून महाराष्ट्रातील शेती परिवर्तनाची व्यापक जनचळवळ आहे. या उपक्रमामुळे शेतकर्‍यांमध्ये निर्माण झालेला आत्मविश्‍वास हेच त्याचे सर्वात मोठे यश आहे. आजचे 18 हजार शेतकरी गट पुढील काळात 50 लाख शेतकर्‍यांना एकत्र आणतील, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
वर्षा निवासस्थानी ‘पानी फाऊंडेशन’च्या सहकार्याने आयोजित ‘फार्मर कप 2026’च्या शुभारंभ कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री ड. आशिष जयस्वाल, पाणी फाउंडेशनचे संस्थापक अभिनेते आमिर खान, अपर मुख्य सचिव विकास चंद्र रस्तोगी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, कृषी विभागाचे सचिव परिमल सिंग, ग्रामविकास विभागाचे सचिव चंद्रकांत पुलकुंडवार, कृषी आयुक्त सूरज मांढरे, कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) रफिक नाईकवाडी यावेळी उपस्थित होते. झूम लिंकद्वारे राज्यातील शेतकरी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी स्मार्ट शेती पचे लोकार्पण करण्यात आले. कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह यांनी 26 ऑगस्ट 2025 पासून राज्यभरात 46 तालुक्यात सुरू असलेल्या फार्मर कपच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या ‘सत्यमेव जयते फार्मर कप 2026’ या उपक्रमामुळे शेतकर्‍यांमध्ये निर्माण झालेला आत्मविश्‍वासच भविष्यातील कृषी परिवर्तनाचा पाया ठरेल.फार्मर कपमधील 18 हजार शेतकरी गट हे महाराष्ट्रातील शेती क्रांतीचे शिल्पकार ठरणार आहेत, त्यांच्या अनुभवातून लाखो शेतकरी प्रेरणा घेतील. विधानमंडळात महिला शेतकरी विधेयक मंजूर करण्यात येणार आहे. शेतीच्या मालकीमध्ये नाव नसलेल्या महिलांनाही अधिकृत शेतकरी म्हणून मान्यता दिली जाणार आहे. मागील वर्षी फार्मर कपमध्ये सहभागी झालेल्या गटांमध्ये सोयाबीन, कापूस आणि मका या पिकांच्या उत्पादनात सरासरी 71 टक्क्यांनी वाढ झाली. सामूहिक खरेदीमुळे कृषी निविष्ठांवर 1,584 कोटी रुपयांची बचत झाली, तर सामूहिक श्रमांमुळे एकरी सुमारे 6 हजार रुपयांची मजुरीची बचत झाली. गटशेतीमुळे उत्पादन खर्च कमी होऊन शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढण्यास मोठी मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्याच्या कृषी धोरणांमध्येही आवश्यक बदल
मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्र हे कृत्रिम बुद्धिमत्तेचा शेतीमध्ये वापर करणारे देशातील पहिले राज्य ठरत आहे. ‘महाविस्तार अ‍ॅप’ आणि ‘फार्मर कप’मधील माहिती एकत्रित करून शेतकर्‍यांना अधिक प्रभावी मार्गदर्शन करण्यात येईल. फार्मर कपमधून मिळालेल्या अनुभवांच्या आधारे राज्याच्या कृषी धोरणांमध्येही आवश्यक बदल करण्यात येतील. राज्य शासनाच्या विविध योजनांचे एकत्रित नियोजन (कन्व्हर्जन्स) केल्यास गटशेती अधिक सक्षम होईल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

COMMENTS