Homeताज्या बातम्या

संस्कार प्ले ग्रुपच्या विद्यार्थ्यांचा आकर्षक रिंगण सोहळा

 अहिल्यानगर : प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या अरणगाव (मेहराबाद) येथे आषाढी एकादशीनिमित्त पारंपरिक दिंडी सोहळा आणि यात्रा उत्सव भक्तिमय वाता

निवृत्तीनाथ पालखी आगमन प्रसंगीबेलापूरमध्ये मांसाहारी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय
‘लोकमंथन न्यूज २४’च्या बातमीचा मोठा इफेक्ट! बालमटाकळीतील आमरण उपोषणाची दोन दिवसांतच दखल
अवकाळीचा तडाखा !

 अहिल्यानगर : प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या अरणगाव (मेहराबाद) येथे आषाढी एकादशीनिमित्त पारंपरिक दिंडी सोहळा आणि यात्रा उत्सव भक्तिमय वातावरणात पार पडला. या दिंडीत संस्कार प्ले ग्रुप व नर्सरी स्कूलच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषेत सहभागी होत सादर केलेल्या रिंगण सोहळ्याने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले.अरणगाव येथे दरवर्षी आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी श्री संत बुवाजी बुवा महाराजांचा यात्रा उत्सव भरतो. पंढरपूरातील श्री विठ्ठल या दिवशी अरणगावात येतात, अशी स्थानिकांची श्रद्धा असल्याने या सोहळ्याला विशेष धार्मिक महत्त्व आहे.आषाढी एकादशीच्या निमित्ताने गावातील आबालवृद्ध मोठ्या उत्साहाने दिंडीत सहभागी झाले होते. यामध्ये संस्कार प्ले ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी, संतांच्या विविध वेशभूषा, वारकरी पोशाख, टाळ, तुळशी वृंदावन आणि भगवे ध्वज हातात घेत दिंडीत सहभाग नोंदवला. चिमुकल्यांनी सादर केलेला रिंगण सोहळा आणि संतांच्या माहितीपूर्ण प्रतिकृती हे या दिंडीचे विशेष आकर्षण ठरले.विद्यार्थ्यांमध्ये बालवयापासून वारकरी परंपरा, संत साहित्य आणि संस्कृतीची ओळख निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बालवारकऱ्यांच्या वतीने श्री संत बुवाजी बुवा मंदिराला हरिपाठाची पुस्तके व बुक कॉर्नर स्टँड भेट देण्यात आला.दिंडीची सांगता विठ्ठल-रुक्मिणीच्या आरतीने झाली. त्यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला ग्रामस्थ, पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्कार प्ले ग्रुपच्या संचालिका प्रा.अमृता अमोल देवकर यांनी सर्वांचे आभार मानले.

COMMENTS