Homeताज्या बातम्या

पूर्णवादी बँकेत पारनेरकर महाराजांच्या जन्मतिथीनिमित्त भव्य रक्तदान शिबिरांचे आयोजन; २५ शाखांमधून सामाजिक बांधिलकी

बीड: पूर्णवादी नागरिक सहकारी बँक मर्या., बीड यांच्या वतीने प.पू. पूर्णवाद वर्धिष्णू डॉ. विष्णु महाराज पारनेरकर व प.पू. पूर्णवाद प्रणेते डॉ. रामचं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सेशेल्सचा सर्वोच्च नागरी सन्मान; ‘ब्ल्यू होरायझनचे संरक्षक’ पुरस्काराने गौरव
सदाभाऊ खोतांनी आंदोलनकर्त्यांना “आतंकवादी” संबोधल्यावरून वादंग; विरोधकांची टीका, बच्चू कडूंकडूनही विधान मागे घेण्याचा सल्ला
गोपीनाथगडावर लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना अभिवादन
वराड कावळेवाडी येथे 26 नोव्हेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिर – संवाद मिडिया  (Sanwad Media)

बीड: पूर्णवादी नागरिक सहकारी बँक मर्या., बीड यांच्या वतीने प.पू. पूर्णवाद वर्धिष्णू डॉ. विष्णु महाराज पारनेरकर व प.पू. पूर्णवाद प्रणेते डॉ. रामचंद्र महाराज पारनेरकर यांच्या जन्मतिथीनिमित्त भव्य रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. बँकेच्या २५ शाखांच्या माध्यमातून १९ ठिकाणी हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येणार असून, सामाजिक बांधिलकी जपत रक्तदानाचा महायज्ञ राबविण्यात येत आहे.

दि. २७ जुलै २०२६ रोजी काळेवाडी (पुणे), सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, जालना रोड (छ. संभाजीनगर), माजलगाव व जालना येथील शाखांमध्ये रक्तदान शिबिर पार पडले. तसेच दि. २८ जुलै रोजी शेंद्रा व वाळूज (छत्रपती संभाजीनगर) येथील शाखांमध्ये शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

पुढे दि. २९ जुलै २०२६ रोजी बीड, परळी, अंबाजोगाई, लातूर, जामखेड, शिरूर कासार, संगमनेर, नाशिक, सिंहगड रोड (पुणे) व परभणी येथील शाखांमध्ये रक्तदान शिबिर पार पडणार आहे. या सर्व रक्तदान शिबिरांमध्ये नागरिकांनी, रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन पूर्णवादी नागरिक सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष जोशी, उपाध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत पारनेरकर तसेच सर्व संचालक, अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS