Homeताज्या बातम्या

सुकेवाडी शिवारात आढळला तरुणाचा मृतदेह

संगमनेर तालुक्यातील घटना; पोलिसांचा तपास सुरु

संगमनेर प्रतिनिधी : संगमनेर शहरालगतच्या सुकेवाडी रस्त्यावरील नाटकी नाल्यात 30 ते 32 वयोगटातील एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. आज शुक्

अकोले तालुक्यातील कोतुळ ग्रामीण रुग्णालयाचे ‘भौतिक आरोग्य’ धोक्यात; मूलभूत सुविधांच्या अभावामुळे रुग्ण आणि कर्मचारी त्रस्त
सीसीटीव्ही मशीनसह लाखोंची चोरी…पुरावाच केला गायब
संतसाहित्य आणि तीर्थस्थळे ही मानवी जीवनाची अमृतस्थळे

संगमनेर प्रतिनिधी : संगमनेर शहरालगतच्या सुकेवाडी रस्त्यावरील नाटकी नाल्यात 30 ते 32 वयोगटातील एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. आज शुक्रवार दि.9 रोजी सकाळी शहर पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत सदर तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कुटीर रुग्णालयात पाठविला आहे. मृत तरुणाच्या शरीरावर मारहाणीसदृश्य खूणा असून तो जखमी अवस्थेत असल्याने त्याचा घातपात झाल्याची दाट शक्यता असून पोलीस त्यादृष्टीनेही तपास करीत आहेत.


सदरचा तरुण या परिसरातच राहतो की अन्य कोठे? तो नेमका कोण आहे? त्याचा कोणी घातपात करुन खून तर केला नाही ना? अशा अनेक शंका यातून निर्माण झाल्या आहेत. पोलिसांनीही घातपाताची शक्यता नाकारली नसून उत्तरीय तपासणीनंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येणार असल्याने तूर्त अहवालाची प्रतीक्षा केली जात आहे. मयत तरुणाची ओळखही अद्यापही स्पष्ट झालेली नाही, त्यामुळे पोलिसांकडून त्याची ओळख पटविण्याचे कामही सुरु आहे. त्यासाठी त्याचे छायाचित्रही सोशल माध्यमातून प्रसारित करण्यात आले असून कोणाला काही माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


या प्रकरणी शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पोलीस तपासात समोर येणार्या तथ्यांच्या आधारावर दाखल गुन्ह्यात बदल केला जाणार आहे. सुकेवाडी परिसरात सदरच्या तरुणाचा मृतदेह आढळल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.

COMMENTS