Homeमहाराष्ट्र

कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर शिवाजी विद्यापीठच्या परीक्षा पुन्हा स्थगित

करोनाने एकूणच सध्याच्या शिक्षण व्यवस्थेपुढे एक भलेमोठे प्रश्‍नचिन्ह उभे केले आहे.

Nanded : योग्य उपचार न मिळाल्याने रुग्ण दगावला – नातेवाईकांचा आरोप (Video)
कवठे- केंजळ रस्ता गेला खड्ड्यात … ; अनेक वर्षापासून दुरुस्ती नसल्याने ग्रामस्थांचा संताप
पिंपळनेर गावी साजरा होणार ‘वाचन प्रेरणा दिन

पांचगणी / वार्ताहर : करोनाने एकूणच सध्याच्या शिक्षण व्यवस्थेपुढे एक भलेमोठे प्रश्‍नचिन्ह उभे केले आहे. परिणामी विद्यार्थी, पालक आणि काही प्रमाणात सरकारही संभ्रमित आहे. शैक्षणिक वर्ष 2020-2021 मधील ऑक्टोबर / नोव्हेंबर हिवाळी सत्रातील सर्व परीक्षा विद्यापीठ / महाविद्यालय स्तरावर ऑनलाईन / ऑफलाईन पध्दतीने दि.22 मार्चपासून सुरू होत्या. तथापि कोरोना विषाणू कोविड-19 संसर्ग साखळी तोडण्यासाठी उपरोक्त संदर्भ क्र 1 नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहे. विद्यापीठाने दोन-तीन वेळा वेळापत्रक बनवूनही, परवा सोमवारी पहिला पेपर झाला. त्याच दिवशी दुपारनंतर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा स्थगित केल्याचा आदेश दिल्याने विद्यार्थी संभ्रमित झाले आहेत. तसेच 6 ते 12 एप्रिल या कालावधीतील परिक्षा रद्द केल्याचे त्यामध्ये नमूद केले आहे. तसेच स्थगित केलेल्या परिक्षाचे आपत्ती व्यवस्थापनाच्या निर्देशानुसार घेण्याबाबतचे नियोजन कळविण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. आता कोरोनासंदर्भात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत

COMMENTS