Homeताज्या बातम्या

मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अ‍ॅण्ड कॉमर्सचा ’उद्योगरत्न’ पुरस्कार वैजनाथअप्पा कोल्हे यांना प्रदान!

परळी वैजनाथ: मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अ‍ॅण्ड कॉमर्स व नांदेड जिल्हा आडत व्यापारी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २९ व्या वर्धापन दिन सोह

मृग नक्षत्र कोरडे; बीड जिल्ह्यात शेतकरी हवालदिल! कापूस, सोयाबीन पिकांवर पावसाअभावी संकट
शेतकऱ्यास मारहाण; कुंभेफळ ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंचासह सहा जणांवर गुन्हा दाखल
आदित्य कृषी महाविद्यालयाच्या कृषिदूतांकडून सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापनाबाबत शेतकर्‍यांना मार्गदर्शन

परळी वैजनाथ: मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अ‍ॅण्ड कॉमर्स व नांदेड जिल्हा आडत व्यापारी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २९ व्या वर्धापन दिन सोहळ्यात परळी वैजनाथ येथील उद्योजक वैजनाथअप्पा लक्ष्मणअप्पा कोल्हे यांना प्रतिष्ठेचा ’उद्योगरत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अ‍ॅण्ड कॉमर्सचे अध्यक्ष आदेशपाल छाबडा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रविंद्र मानगणावे, उपाध्यक्ष सुनील किर्दक, सर्वोच्च न्यायालयाचे विधिज्ञ राहुल हिंगमिरे व गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या अध्यक्षा राजश्रीताई हेमंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करत वैजनाथअप्पा कोल्हे यांनी १९९६ मध्ये छोट्या किराणा व्यवसायातून सुरुवात केली. २००८ मध्ये ’शिवम् सुपर शॉपी’ आणि २०२५ मध्ये अत्याधुनिक ’शिवम् सुपर मार्केट’ उभारून त्यांनी ग्राहकनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि गुणवत्तेच्या बळावर यशस्वी उद्योजक म्हणून ओळख निर्माण केली. त्यांच्या उद्योजकीय कार्यासोबतच सामाजिक बांधिलकी, सेवाभाव आणि धार्मिक श्रद्धेचाही या पुरस्कारातून गौरव करण्यात आला.

या सन्मानामुळे परळी शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

COMMENTS