Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाशिक शहर व सिन्नर येथे विविध ठिकाणी शिवजयंती निमित्त शांतिगिरीजी महाराजांनी केले शिवपूजन 

नाशिक प्रतिनिधी- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव निमित्त अनंत विभूषित  श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शां

 लोकसभेसाठी शांतिगिरीजी महाराजांची यंत्रणा गतिमान 
नाशिक ग्रामीण भागात शांतिगिरीजी महाराजांचा झंझावती प्रचार दौरा 
जय बाबाजी भक्त परिवार शांतिगिरीजी महाराजांना नाशिक लोकसभा निवडणुकीत उतरविणार  

नाशिक प्रतिनिधी- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव निमित्त अनंत विभूषित  श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी नाशिक,नाशिकरोड व सिन्नर परिसरातील विविध ठिकाणी आयोजित शिवजयंती उत्सवात शिवपूजन केले.यावेळी भविकांनी जय शिवराय,जय बाबाजी असा जयघोष करत बाबाजींचे स्वागत केले. निष्काम कर्मयोगी जगदगुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज धर्मपीठाचे पिठाधीश्वर अनंत विभूषित महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी शिवजयंतीच्या पर्वकालावर विविध ठिकांनी शिवपूजन केले.सिन्नर  शहरातील राजेशाही प्रतिष्ठान,बारगावं पिंप्री,शिंदे गाव, चेहडी,नाशिकरोड,जेलरोड,नाशिक शहरातील रविवार कारंज्या,हिरावाडी, पंचवटी कारंज्या,मालेगाव स्टॅन्ड,अशोक स्तंभ,मुंबई नाका, भद्रकाली,अमृतधाम यांसह विविध परिसरातील शिवजयंती उत्सवा प्रसंगी शिवरायांचे पुष्पहार अर्पण करून पूजन केले. यावेळी या विविध  ठिकाणी शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने अनंत विभूषित महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराजांचे स्वागत करण्यात आले. शिवजयंती उत्सवात बाबाजींच्या दर्शनासाठी भविकांनी गर्दी करत टाळ्या वाजवून स्वागत केले.याप्रसंगी जय शिवराय,जय बाबाजींच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.

COMMENTS