Homeताज्या बातम्या

मोनिका राजळे यांच्या उमेदवारीचा पाथर्डीत जल्लोष

पाथर्डी : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली असून यामध्ये शेवगाव विधानसभा मतदारसंघातून तिसर्‍यांदा विद्यमान आ

समर्थ बाबुराव पाटील महाराजांचा यात्रोत्सव मार्चमध्ये  
शिक्षकांचे प्रलंबीत प्रश्‍नांची सकारात्मक पध्दतीने सोडवणुक होण्याची अपेक्षा -बाबासाहेब बोडखे
गोकुंदा स्मशानभूमीवरील अतिक्रमण हटवण्याचा वंचित बहुजन आघाडीचा इशारा

पाथर्डी : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली असून यामध्ये शेवगाव विधानसभा मतदारसंघातून तिसर्‍यांदा विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना पुन्हा उमेदवारी घोषित होताच भाजपाच्या वतीने पाथर्डी शहरातील नाईक चौकात फटाके फोडून तसेच एकमेकांना पेढा भरवत पदाधिकार्‍यांच्या वतीने जल्लोष करण्यात आला.
यावेळी अभय आव्हाड, मृत्युंजय गर्जे, नंदकुमार शेळके, विष्णुपंत अकोलकर, धनंजय बडे, बंडू बोरुडे, शुभम गाडे, अजय रक्ताटे, अजय भंडारी, रवींद्र वायकर, बंडू पठाडे, महेश बोरुडे, प्रसाद आव्हाड, प्रवीण राजगुरू, प्रतिक खेडकर, नामदेव लबडे, संदीप वायकर, प्रशांत शेळके, भैय्या इजारे, रमेश हंडाळ, नामदेव लबडे, जे बी वांढेकर, बापूसाहेब गर्जे, सचिन वायकर, भैय्या इजारे, राजू सुरवसे, संदीप पवार, अशोक मंत्री, डॉ.जगदीश मुने, महेश काटे, हर्षल गर्जे, सतीश शिरसाठ मेजर, अक्षय काळे, नवनाथ नरोटे, मंगल कोकाटे, दुर्गा भगत, सिंधुताई साठे, स्मिता लाड आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना अभय आव्हाड यांनी म्हटले की,आमदार मोनिका राजळे यांनी 10 वर्षात पक्षासाठी आणि तालुक्याच्या विकासासाठी केलेल्या कामाची पावती म्हणून भारतीय जनता पार्टीच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी पहिल्याच यादीत उमेदवारी दिली असून वरिष्ठ नेते नरेंद मोदी, जी.पी.नड्डा,अमित शहा,देवेंद्र फडणवीस,पंकजा मुंडे,राधाकृष्ण विखे पाटील यांचे तालुक्याच्या वतीने आभार व्यक्त करत येणार्‍या निवडणुकीत सर्व कार्यकर्ते जोमाने काम करून राजळे यांना प्रचंड मतांनी विजयी करतील असा विश्‍वास व्यक्त केला.

COMMENTS