Homeताज्या बातम्या

धनेश्वर देवस्थानात ‘ओ साजणा…’ धार्मिक अल्बमचे भव्य चित्रीकरण संपन्न

देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यातील धानोरे येथील ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व लाभलेल्या श्री धनेश्वर देवस्थानात श्रीकृष्णभक्तीवर आधारित 'ओ साजणा.

जुन्या वादातून कुटुंबावर जीवघेणा हल्ला; दागिने लुटले; राहुरी फॅक्टरी परिसरातील घटना; पाच जणांविरुद्ध गुन्हा
 रमेश तुपे यांचे निधन
 विश्वनाथ गाढे यांचे निधन

देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यातील धानोरे येथील ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व लाभलेल्या श्री धनेश्वर देवस्थानात श्रीकृष्णभक्तीवर आधारित ‘ओ साजणा… आता मुरलीची मधुर तान ऐकव ना..’ या धार्मिक अल्बम गीताचे भव्य चित्रीकरण नुकतेच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. प्रवरा नदीच्या निसर्गरम्य तीरावर वसलेले मंदिर, भव्य घाट आणि भक्तिमय वातावरणामुळे चित्रीकरणाला विशेष आकर्षण लाभले.

अहिल्यादेवी होळकर यांच्या काळात जीर्णोद्धार झालेल्या धनेश्वर मंदिराचा ऐतिहासिक वारसा आणि परिसरातील नैसर्गिक सौंदर्यामुळे या गीताच्या चित्रीकरणासाठी या स्थळाची निवड करण्यात आली. त्यामुळे धनेश्वर देवस्थानाची ओळख धार्मिक पर्यटनाबरोबरच सांस्कृतिक आणि कलात्मक उपक्रमांसाठीही अधिक दृढ झाली आहे.

एन. पी. व्हिजन फिल्मचे आबा निर्मळ यांच्या मार्गदर्शनाखाली साकारलेल्या या गीतातून राधा-कृष्ण भक्तीपरंपरेतील मधुराभक्ती, समर्पण, विरह आणि ईश्वरप्राप्तीची ओढ प्रभावीपणे मांडण्यात आली आहे. श्रीकृष्णाच्या मुरलीची दिव्य हाक, नामस्मरणाचे महत्त्व आणि भक्तीचा संदेश गीतातून भावपूर्ण पद्धतीने व्यक्त करण्यात आला आहे.

या अल्बममध्ये ऍड. प्राजक्ता घोलप यांनी प्रमुख भूमिका साकारली असून प्रिया निर्मळ, हनुमंत शिंदे, प्रणाली घोलप आणि प्रमोद निर्मळ यांनीही प्रभावी अभिनय केला आहे. धनेश्वर देवस्थानातील प्रसन्न वातावरणामुळे चित्रीकरणाचा अनुभव अविस्मरणीय ठरल्याची भावना कलाकारांनी व्यक्त केली.

चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर धनेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने कलाकार, तांत्रिक कर्मचारी आणि संपूर्ण निर्मिती पथकाचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी देवस्थानचे विश्वस्त, ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS