Homeमहाराष्ट्रशहरं

सोनहिरा कारखान्याची सहाव्यांदा निवडणूक बिनविरोध

कडेगाव / प्रतिनिधी : डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्यास सलग सहाव्यांदा यश आले. निवडणूक निर्णय अध

वादळी पावसामुळे आंब्याचे नुकसान
बोगस बि-बियाण्यांसह खतांची विक्री होणार नाही याची दक्षता घ्यावी : पालकमंत्री
इस्लामपूर बाजार समिती निवडणुकीत 49 जणांची माघार; राष्ट्रवादी विरूध्द शेतकरी परिवर्तन पॅनेलमध्ये थेट लढत

कडेगाव / प्रतिनिधी : डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्यास सलग सहाव्यांदा यश आले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी गणेश मरकड यांनी काम पाहिले. बिनविरोध संचालक मंडळात आ. मोहनराव कदम, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम व सागरेश्‍वर सुतगीरणीचे अध्यक्ष शांताराम कदम यांचा समावेश आहे.
नवनिर्वाचित संचालक गटवार पुढीलप्रमाणे : मतदारसंघ क्र.1 : गट नं. 1 डॉ. विश्‍वजित पतंगराव कदम (सोनसळ), रघुनाथ श्रीपती कदम (सोनसळ), प्रभाकर चंद्रु जाधव (आसद), मतदारसंघ क्र. 1 : गट नं. 2 आ. मोहनराव श्रीपती कदम (चिंचणी), पोपटराव दिनकर महिंद (देवराष्ट्रे), शांताराम मोहनराव कदम (चिंचणी), मतदारसंघ क्र. 1 : गट नं. 3 सयाजी बाबुराव धनवडे (भाळवणी), दिलीपराव भगवान सूर्यवंशी (वांगी), निवृत्ती बापू जगदाळे (अंबक), मतदारसंघ क्र. 1 : गट नं. 4 भिमराव मारुती मोहिते (सोहोली), पंढरीनाथ विठोबा घाडगे (रायगाव), दीपक उर्फ पुरुषोत्तम शिवाजीराव भोसले (कडेगाव), मतदारसंघ क्र. 1 : गट नं. 5 जालिंदर रामचंद्र महाडिक (नेवरी), युवराज पांडुरंग कदम (शेळकबाव), तानाजीराव नारायण शिंदे (चिखली), मतदारसंघ क्र. 2 बापूसाहेब दत्तात्रय पाटील (सोनकिरे), मतदारसंघ क्र. 3 शिवाजी भिकू काळेबाग (येडे), मतदारसंघ क्र. 4 शारदा दत्तात्रय कदम (खेराडे वांगी), सुनीता संभाजीराव जगताप (येवलेवाडी), मतदारसंघ क्र. 5 जगन्नाथ गणपती माळी (शिरगाव), मतदारसंघ क्र. 6 शिवाजी जगन्नाथ गढळे (वडियेरायबाग). यांची संचालक पदी बिनविरोध निवड झाली.

COMMENTS