जुन्या वादातून कुटुंबावर जीवघेणा हल्ला; दागिने लुटले; राहुरी फॅक्टरी परिसरातील घटना; पाच जणांविरुद्ध गुन्हा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जुन्या वादातून कुटुंबावर जीवघेणा हल्ला; दागिने लुटले; राहुरी फॅक्टरी परिसरातील घटना; पाच जणांविरुद्ध गुन्हा

देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी परिसरात जुन्या वादातून एका कुटुंबावर लाकडी काठ्या व लोखंडी गजाने जीवघेणा हल्ला केल्याची घटना र

राहुरी पोटनिवडणुकीसाठी 103 उमेदवारी अर्जांची खरेदी
घरावर झाड कोसळून नुकसान
राहुरी पोटनिवडणुकीसाठी सात उमेदवार रिंगणात
The current image has no alternative text. The file name is: Rahuri-Police-Stn.jpg

देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी परिसरात जुन्या वादातून एका कुटुंबावर लाकडी काठ्या व लोखंडी गजाने जीवघेणा हल्ला केल्याची घटना रविवारी (दि. २९) घडली. या हल्ल्यात महिला, तिचे पती व दोन मुले जखमी झाले असून, हल्लेखोरांनी महिलेच्या गळ्यातील सुमारे ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून नेल्याची माहिती पोलिसांनी दिली.

याप्रकरणी कल्याणी राजेंद्र गाडे (वय ३०, रा. कनगर, ता. राहुरी) यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सकाळी अकराच्या सुमारास फिर्यादी आपल्या कुटुंबासह राहुरी फॅक्टरी परिसरात असताना आरोपींनी हातात लाकडी काठ्या व लोखंडी गज घेऊन त्यांना गाठले.

आरोपींनी कल्याणी गाडे, त्यांचे पती राजेंद्र गाडे तसेच मुले वैभव व श्रेयश यांना लाथाबुक्क्यांनी व काठ्या-गजाने मारहाण केली. यावेळी शिवीगाळ करत गंभीर स्वरूपाच्या धमक्या दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. या गोंधळात आरोपी रमेश परसराम गाडे याने कल्याणी गाडे यांच्या गळ्यातील सुमारे तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठन जबरदस्तीने तोडून नेल्याचे सांगितले आहे.

या प्रकरणी राहुरी पोलिसांनी वृषाली रमेश गाडे, रमेश परसराम गाडे, सार्थक रमेश गाडे, शुभम रमेश गाडे (सर्व रा. राहुरी फॅक्टरी) तसेच दिनकर भास्कर कर्पे (रा. टाकळीमिया) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रवीण बागुल करीत असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

COMMENTS