Homeताज्या बातम्या

‘संत ज्ञानेश्वर’ शाळेचा भव्य दिंडी सोहळा; कोपरगावकरांना मिळाली पंढरपूर वारीची अनुभूती

कोपरगाव: संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषेत शहरातून भव्य आषाढी दिंडी काढत कोपरगावकरांना पंढरपूर वारीची अनुभू

राज्यातील कवी, शिक्षक, साहित्यिक, कलावंतांचा विद्यार्थी आंदोलनाला जाहीर पाठिंबा; शिक्षण व्यवस्थेतील गैरप्रकारांवर कठोर कारवाईची मागणी
अ‍ॅड. साळुंके यांनी वकिलीला दिली समाजकार्याची जोड; उद्योजक मानसिंग पवार यांचे गौरवोद्गार,
घुले प्रकरण: घटनेदिवशी मी अन् गाडीही घरीच! सौरभ सोनवणेंनी आरोप फेटाळले, कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची तयारी

कोपरगाव: संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषेत शहरातून भव्य आषाढी दिंडी काढत कोपरगावकरांना पंढरपूर वारीची अनुभूती दिली. टाळ-मृदुंग, लेझिम, भगव्या पताका आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात ही दिंडी अत्यंत उत्साहात पार पडली.

दिंडीदरम्यान विद्यार्थ्यांनी ‘भेसळमुक्त भारत, निरोगी भारत’, ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’, ‘वृक्ष संवर्धन ही काळाची गरज’ अशा विविध सामाजिक जनजागृतीपर संदेशांचे फलक हातात घेऊन नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. सराफ बाजारातील सोमेश्वर महादेव मंदिरात पालखीचे भक्तिभावाने पूजन करण्यात आले. या प्रसंगी विद्यार्थ्यांना केळी व साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले.

माजी नगराध्यक्ष तथा संस्थेचे संस्थापक राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या दिंडी सोहळ्यात संस्थेचे मॅनेजिंग ट्रस्टी विशाल झावरे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

COMMENTS