Homeताज्या बातम्या

मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील 8 जणांचा शोध सुरूचदोन दिवस उलटले तरी शोधमोहीम युद्धपातळीवर

पुणे : पिंपरी-चिंचवडमधील मोशी कचरा डेपो येथे झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर सलग दुसर्‍या दिवशीही बचाव आणि शोधकार्य अविरत सुरू आहे. आतापर्यंत कचर्‍याच

मोशी दुर्घटनेत एकाचा मृत्यू, 9 जणांची सुटका
कर्नाटकात खडक कोसळून सात मजुरांचा मृत्यू
लखनऊमध्ये कोचिंग सेंटरला भीषण आग; 14 मुलांचा होरपळून मृत्यूपंतप्रधानांकडून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपयांची मदत जाहीर


पुणे : पिंपरी-चिंचवडमधील मोशी कचरा डेपो येथे झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर सलग दुसर्‍या दिवशीही बचाव आणि शोधकार्य अविरत सुरू आहे. आतापर्यंत कचर्‍याच्या ढिगार्‍याखालून नऊ जणांना बाहेर काढण्यात यश आले असले, तरी उपचारादरम्यान एका कर्मचार्‍याचा मृत्यू झाला आहे. अद्याप आठ कर्मचारी ढिगार्‍याखाली अडकल्याची भीती व्यक्त होत असून त्यांचा शोध घेण्यासाठी सर्व यंत्रणा शर्थीने प्रयत्न करत आहेत.
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, अग्निशमन विभाग, पोलिस, लष्कर तसेच अन्य बचाव पथके अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि श्‍वानपथकाच्या मदतीने शोधमोहीम राबवत आहेत. कचर्‍याचा ढिगारा अत्यंत मोठा आणि खोल असल्यामुळे बचावकार्यात अनेक अडचणी येत असूनही शोधकार्य थांबविण्यात आलेले नाही. दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या आतील दृश्यांचा एक चित्रफीत समोर आला आहे. त्यामध्ये कार्यालयातील टेबल, विद्युत उपकरणे आणि कचर्‍याखाली दबलेले साहित्य स्पष्ट दिसत आहे. या दृश्यांमुळे दुर्घटनेची भीषणता अधोरेखित झाली आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या बेपत्ता कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांनी प्रशासनाने अधिक वेगाने आणि सुरक्षित पद्धतीने बचावकार्य करावे, अशी मागणी केली आहे. दुर्घटनेनंतर बचाव पथकाने आतापर्यंत नऊ कर्मचार्‍यांना ढिगार्‍याखालून बाहेर काढले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, गंभीर दुखापतीमुळे एका कर्मचार्‍याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून उर्वरित कर्मचार्‍यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता वाढली आहे. दुर्घटनेत बेपत्ता झालेल्यांमध्ये छत्रपती संभाजीनगर येथील 32 वर्षीय महेश कुंभार यांचा समावेश आहे. उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते वर्षभरापासून कचर्‍यापासून ऊर्जा निर्मिती प्रकल्पात मनुष्यबळ विभागात कार्यरत होते. दुर्घटनेची माहिती कंपनीकडून मध्यरात्री त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली. त्यानंतर महेश यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. महेश यांचे बंधू संतोष कुंभार तातडीने घटनास्थळी पोहोचले. काहीतरी चमत्कार घडावा आणि माझा भाऊ सुखरूप बाहेर यावा, अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. दुर्घटना घडताच काही कर्मचारी स्वतःहून बाहेर पडण्यात यशस्वी झाले. त्यानंतर बचाव पथकाने टप्प्याटप्प्याने आणखी नऊ जणांना बाहेर काढले. मात्र, महेश कुंभार, सनी माने, राहुल गायकवाड, सुनील कोरके, अक्षय सावंत, रणजीत पाटील, नागेश गायकवाड आणि वामन कसबे यांचा अद्याप शोध लागलेला नाही.
बेपत्ता कर्मचार्‍यांच्या नातेवाईकांचा आक्रोश
दोन दिवस उलटूनही आठ कर्मचार्‍यांचा शोध लागलेला नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांचा धीर सुटत चालला आहे. कचरा डेपो परिसरात नातेवाईकांची मोठी गर्दी असून आपल्या प्रियजनांचा सुखरूप शोध लागावा, अशी प्रार्थना ते करत आहेत. प्रशासनाने शेवटच्या व्यक्तीचा शोध लागेपर्यंत मोहीम सुरूच राहील, असे स्पष्ट केले आहे.
अ‍ॅड. आंबेडकरांनी केली घटनास्थळाची पाहणी
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मोशी येथील दुर्घटनास्थळी भेट देऊन सुरू असलेल्या बचावकार्याचा आढावा घेतला. त्यांनी संबंधित अधिकार्‍यांशी चर्चा करून शोधमोहीमेची माहिती घेतली. याचबरोबर दुर्घटनाग्रस्त भागातील मलबा हटविणे आणि धोकादायक संरचना सुरक्षित करण्याचे कामही वेगाने सुरू आहे.

COMMENTS