नांदेड: शहरातील काँग्रेस कार्यालयासमोर भाजपाने केलेल्या आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहत जोरदार प्रतिउत्तर

नांदेड: शहरातील काँग्रेस कार्यालयासमोर भाजपाने केलेल्या आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहत जोरदार प्रतिउत्तर दिल्याने काही काळ परिसरात राजकीय वातावरण चांगलेच तापले. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. संभाव्य तणाव लक्षात घेऊन पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवत परिस्थिती नियंत्रणात ठेवली.
भाजपाच्या आंदोलनाची माहिती मिळताच काँग्रेसचे उत्तर जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे आणि महानगराध्यक्ष अब्दुल गफ्फार यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते काँग्रेस कार्यालयासमोर जमले. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आल्यानंतर घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी काँग्रेस कार्यालयासमोर बॅरिकेड्स उभारले, तसेच दोन्ही गटांच्या मध्यभागी पोलीस व्हॅन उभी करून सुरक्षित अंतर राखण्यात आले.
काँग्रेस पदाधिकार्यांचा दावा आहे की, कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीमुळे आणि आक्रमक घोषणाबाजीमुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांना बॅरिकेड्स ओलांडता आले नाही. त्यानंतर भाजपाने नियोजित आंदोलन पूर्ण करून तेथून माघार घेतली. या दाव्याबाबत भाजपाकडून तत्काळ कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.
या संपूर्ण घडामोडीदरम्यान पोलिसांनी संयमाने परिस्थिती हाताळली. कोणताही अनुचित प्रकार घडू न देता कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात पोलिसांना यश आले.
या वेळी उत्तर जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे, महानगराध्यक्ष अब्दुल गफ्फार, सुरेंद्र घोडजकर, श्रावण रांपनवाड, नगरसेवक मुन्ना अब्बास, सत्यपाल सावंत, मोसिन खान, महेश देशमुख तरोडेकर, रमेश गोडबोले, डॉ. बाकी, कुमार कुर्तडीकर, दीपकसिंग हुजारीया, संजय वाघमारे, बापूसाहेब पाटील, अब्दुल रहिम, गगन यादव, शंकर शिंदे, अतुल पेदेवाड, गणेश पाटील, आंबादास रातोळे, नागराज सुलगेकर, प्रसेनजित वाघमारे, जेशिका शिंदे, ज्योती कदम, सुरेखा वैद्य, किर्तने ताई, अक्षय नळगे, नईम शेख, मुरली देशमुख, गोविंद पाटील, प्रकाश दिपके, अजहर शेख, प्रथमेश गिरी, कलिम शेख, सोनू पाटील, जगदीश पावडे यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS