Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

४७ वर्षीय महिलेने १८ व्या मजल्यावरून उडी मारून संपवलं जीवन

मुंबई प्रतिनिधी - मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भांडुपच्या टेंभिपाडा परिसरात १८ व्या मजल्यावरून उडी मारून महिलेने आत्महत्या केल्यान

सासरच्या छळाला कंटाळून कर्जतमध्ये विवाहितेची आत्महत्या
प्रियकराने कर्ज न फेडल्याने प्रेयसीची आत्महत्या
विदर्भात शेतकरी आत्महत्येचे सत्र वाढले

मुंबई प्रतिनिधी – मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भांडुपच्या टेंभिपाडा परिसरात १८ व्या मजल्यावरून उडी मारून महिलेने आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या महिलेने आजारपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. भांडुप पूर्व परिसरात एका उच्चभ्रू इमारतीच्या १८व्या मजल्यावरून उडी मारून महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. रीना सोलंकी (वय ४७) असे मृत महिलेचे नाव आहे. महिलेने नैराश्यातून आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी भांडुप पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. रीना सोलंकी गेल्या ३ महिन्यांपासून विविध आजारांनी ग्रस्त होत्या. तसेच मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होत्या. परिणामी त्यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. ही घटना भांडुप पूर्व परिसरातील २२ मजली त्रिवेणी संगम हाऊसिंग सोसायटीमध्ये रविवारी सकाळी घडली. हेही वाचा: Supriya Sule: संजय राऊतांच्या ‘त्या’ टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘अजितदादांवर केलेल्या टीकेवर मला हसू…’ या इमारतीच्या १८ व्या मजल्यावरील खिडकीतून त्यांनी उडी मारली. या घटनेनंतर सोलंकी यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. भांडुप पोलिसांकडून अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

COMMENTS