दिल्ली येथील जंतर-मंतरवर आंदोलन करणार्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड.

दिल्ली येथील जंतर-मंतरवर आंदोलन करणार्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या पार्श्वभूमीवर अंबाजोगाई शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शहराध्यक्ष गोविंद मस्के यांच्या नेतृत्वाखाली बंद पाळण्यात आला.
या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ मार्गदर्शक ड. सतीश काळंम पाटील, युवा शहराध्यक्ष अमोल हातागळे, युवा तालुकाध्यक्ष अनिल कांबळे, शहर महासचिव नितीन सरवदे, रत्नदिप सरवदे, सतीश सोनवणे, अविनाश घनघाव यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले. या बंदला विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला. भारतीय बौद्ध महासभेचे शहराध्यक्ष सुधाकर हातागळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष आसिफोद्दीन खतीब (बाबा), रिपाइ (आठवले गट)चे दीपक कांबळे, शिवसेना (ठाकरे गट)चे मदन परदेशी, कॉ. बब्रूवाहन पोटभरे, अजय बुरांडे, मनसेचे सुनील जगताप, लोकजनशक्ती पार्टीचे राजेश वाहुळे, रिपाइ (खरात गट)चे अक्षय भुंबे, अरुण बनसोडे युवा आंदोलनाचे अशोक पालके, सामाजिक कार्यकर्ते धीमंत राष्ट्रपाल, युवा नेते अमोल पॉळे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. व्यापारी, व्यावसायिक, शैक्षणिक संस्था, शाळा-महाविद्यालये तसेच नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद देत बंद यशस्वी करण्यात मोलाचे योगदान दिले. बंददरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करणार्या पोलीस प्रशासनाचे तसेच वस्तुनिष्ठ वार्तांकन करणार्या पत्रकार बांधवांचे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. अंबाजोगाईतील नागरिक, व्यापारी, विविध पक्ष-संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलेल्या सहकार्यामुळे हा बंद शांततापूर्ण आणि यशस्वी झाल्याचे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकार्यांनी सांगि

COMMENTS