Homeताज्या बातम्या

लोणी व्यंकनाथ येथे शेततळ्यात पडून दोन चिमुकल्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू; रुग्णवाहिका वेळेवर न मिळाल्याचा आरोप

श्रीगोंदा: श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथे अत्यंत हृदयद्रावक घटना घडली असून, शेततळ्यात पडून दोन सख्ख्या चिमुकल्या बहिणींचा दुर्दैवी मृत्

जंतर-मंतरवर पुन्हा वाढली आंदोलनाची धार; हजारो विद्यार्थी जमले एकत्र, पोलिसांचा मोठा ताफा तैनात
स्वतःविरुद्धच गुन्हा दाखल करा! उपविभागीय अधिकार्‍यांचे थेट किनवट तहसीलदारांना पत्र; प्रशासकीय वर्तुळात प्रचंड संभ्रम
गौतम खंडागळे ‘अष्टपैलू समाजभूषण’ तर एम.एम.शेख ‘कला-साहित्य व समाजभूषण’ पुरस्काराने सन्मानित; सा. युवा लोकमित्र सोहळ्यात अभिनंदनाचा वर्षाव

श्रीगोंदा: श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथे अत्यंत हृदयद्रावक घटना घडली असून, शेततळ्यात पडून दोन सख्ख्या चिमुकल्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून, रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न झाल्याने मुलींचा जीव गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आनंदी अनिल कोंडेकर (वय ३ वर्षे) आणि वीरा प्रवीण कोंडेकर या दोन चिमुकल्या बहिणी शेततळ्याजवळ खेळत असताना त्यांचा तोल जाऊन त्या पाण्यात पडल्या. ही बाब लक्षात येताच ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत दोन्ही मुलींना पाण्यातून बाहेर काढले.

त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी नेण्यासाठी आरोग्य केंद्राशी संपर्क साधून रुग्णवाहिका मागविण्यात आली. मात्र, रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध झाली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. उपचारासाठी विलंब झाल्याने दोन्ही निष्पाप चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

या दुर्दैवी घटनेने संपूर्ण लोणी व्यंकनाथ गाव शोकसागरात बुडाले असून, दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावातील नागरिकांनी संबंधित वैद्यकीय यंत्रणेच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, तसेच ग्रामीण भागातील आपत्कालीन आरोग्य सेवा आणि रुग्णवाहिका व्यवस्था अधिक सक्षम करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.

COMMENTS