Homeताज्या बातम्या

उद्योग विश्वाला डिग्री नव्हे, तर कौशल्य हवेत; संजीवनी संकल्प २०२६ कार्यक्रमात अजय सेवेकरी यांचे प्रतिपादन

कोपरगाव: उद्योग विश्वाला केवळ डिग्री असणारे नव्हे तर समस्या सोडविणारे, नवे बदल स्वीकारणारे आणि सातत्याने नवनवीन कौशल्य आत्मसात करणारे विद्यार्थी

संजीवनी पॉलिटेक्निकच्या ३५ विद्यार्थ्यांना नोकरी
संजीवनी पॉलिटेक्निकच्या १७ विद्यार्थ्यांना नामांकित कंपनीत नोकरी; कॅम्पस प्लेसमेंटमध्ये यश
‘संजीवनी’ हा केवळ संस्थांचा समूह नसून एक अखंड परिवार; आमदार विवेक कोल्हे यांचे प्रतिपादन

कोपरगाव: उद्योग विश्वाला केवळ डिग्री असणारे नव्हे तर समस्या सोडविणारे, नवे बदल स्वीकारणारे आणि सातत्याने नवनवीन कौशल्य आत्मसात करणारे विद्यार्थी हवे असतात. आजच्या वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात पुस्तकातील ज्ञानापुरते मर्यादित राहून चालणार नाही. करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी तुमचे कौशल्येच निर्णायक ठरतात आणि तेच तुम्हाला उद्योगक्षेत्रात टिकवून ठेवतील, असे प्रतिपादन प्रॉस्पिरा इंडिया ऑटोमोटिव्ह प्रॉडक्शनचे मॅनेजिंग डायरेक्टर अजय सेवेकरी यांनी केले.

संजीवनी युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ सायन्स, स्कूल ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट आणि स्कूल ऑफ फार्मास्युटिकल सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘संजीवनी संकल्प २०२६’ या नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागत कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट तथा संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे होते.

अमित कोल्हे म्हणाले की, संजीवनीचा ‘स्टुडंट फर्स्ट’ हा दृष्टिकोन असून येथे शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे चांगले करिअर घडविण्याचा आमचा प्रयत्न असतो. फक्त विद्यार्थ्यांनी प्राध्यापक वर्ग जेवढं सांगतो, ती प्रत्येक गोष्ट गांभीर्याने करायला हवी. चांगला सीजीपीए महत्त्वाचा असला तरी तोच यशाचा एकमेव निकष नसतो. तुमची डिग्री आणि सीजीपीए तुम्हाला जॉब मिळविण्यासाठी पात्र बनवते, पण कौशल्य तुम्हाला खऱ्या अर्थाने रोजगारक्षम बनवतात तसेच तुमचा जॉब आणि भविष्य सुरक्षित करतात. त्यामुळे आतापासूनच कौशल्य आत्मसात करण्यावर भर दिला पाहिजे.

यावेळी व्यासपीठावर डॉ. ठाकूर, डीन डॉ. कविथा राणी, डॉ. आर. प्रिया, डॉ. सरिता पवार, डॉ. मकरंद कुलकर्णी, डॉ. विनोद मालकर, इम्रान शेख, रजिस्ट्रार प्रा. अमोल ढाकणे आदी मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS