इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धात जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसत असतानाच, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला आणखी एक मोठा दणका

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धात जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसत असतानाच, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला आणखी एक मोठा दणका दिला आहे. भारताला ज्या निर्णयाची भीती होती तेच घडले असून, ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारतावर १० टक्के टॅरिफचा (शुल्क) बॉम्ब फोडला आहे. अमेरिकेच्या या नव्या टॅरिफ धोरणाचा फटका भारतासह जगातील तब्बल १७ देशांना बसला आहे.
अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधींनी ‘सेक्शन ३०१’ (Section 301) लागू करत हे नवीन टॅरिफ धोरण जाहीर केले आहे. अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीर यांनी मानवाधिकारांचे उल्लंघन आणि अनुचित व्यापार पद्धती यांसारख्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी ही कठोर पावले उचलल्याचे स्पष्ट केले. ट्रम्प यांनी याबाबत बोलताना सांगितले की, “व्यापार प्रतिनिधींच्या सल्ल्यानुसार या देशांमधील वस्तूंवर १० टक्के टॅरिफ लावणे आवश्यक होते, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय निर्बंधांची प्रभावी अंमलबजावणी होण्यास मदत होईल.”
या निर्णयाचा फटका भारतासह त्याचे शेजारी राष्ट्र आणि जगातील प्रमुख देशांना बसला आहे. भारत, पाकिस्तान, बांगलादेश, कॅनडा, अर्जेंटिना, कंबोडिया, श्रीलंका, मलेशिया, मेक्सिको, इंडोनेशिया, ब्रिटन, इक्वाडोर, अल साल्वाडोर, होंडुरास, ग्वाटेमाला, त्रिनिदाद आणि टोबॅगो या १७ देशांवर १० टक्के टॅरिफ लादण्यात आला आहे, तर काही देशांवर १२.५ टक्क्यांपर्यंत अधिक टॅरिफ लावला आहे.
रशियाकडून कच्चे तेल खरेदी केल्याच्या मुद्द्यावरून यापूर्वीही भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी संबंध ताणले गेले होते. त्यानंतर भारताला काही प्रमाणात दिलासा मिळाला होता; मात्र आता पुन्हा अमेरिकेने लावलेल्या या मोठ्या टॅरिफमुळे अमेरिकेत भारतीय वस्तूंची निर्यात करणे व्यापाऱ्यांसाठी अधिक कठीण आणि महागडे ठरणार आहे. ‘मित्र राष्ट्र’ म्हणणाऱ्या अमेरिकेच्या या भूमिकेमुळे भारतीय उद्योग जगतात मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.

COMMENTS