Homeताज्या बातम्या

राजा रघुवंशी हत्याकांडातील मुख्य आरोपी सोनम रघुवंशीचा जामीन रद्द; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका

इंदूर: इंदूरमधील गाजलेल्या राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी सोनम रघुवंशी हिला सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. ग

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या गेवराई शाखेच्या सदस्यपदी सुरेश आहेर यांची नियुक्ती
अॅमेझॉनला महाराष्ट्रात गुंतवणुकीच्या मोठ्या संधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँड्र्यू जॅसी यांना आवाहन
रस्ते की पार्किंग? नांदेडची वाहतूक कोंडीत गुदमरली; कोचिंग क्लासेस, बेशिस्त पार्किंग आणि निष्क्रिय यंत्रणेवर प्रश्नचिन्ह!
SC overturns Sonam Raghuvanshi's bail in honeymoon murder case |  Mathrubhumi English

इंदूर: इंदूरमधील गाजलेल्या राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी सोनम रघुवंशी हिला सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. गुरूवारी झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने तिचा जामीन रद्द केला आहे.

यापूर्वी २१ जुलै रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने सोनमला आत्मसमर्पण करण्याचा सल्ला देत तिच्यासमोर दोन पर्याय ठेवले होते. पहिला पर्याय म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाने मेघालय सरकारच्या अपिलावर तिचा युक्तिवाद ऐकून अंतिम आदेश पारित करावा. तर दुसरा पर्याय, सोनमने आत्मसमर्पण करावे, जेणेकरून तपास यंत्रणा तिची सखोल चौकशी करू शकतील आणि या काळात तिच्या जामिनावरही पुनर्विचार केला जाऊ शकेल.

मात्र, गुरूवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने तिचा जामीन रद्द करण्याचा निर्णय दिल्यामुळे सोनम रघुवंशीच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

COMMENTS