Homeताज्या बातम्यापुणे

पुण्यात तलाठ्याला 25 हजाराची लाच घेतांना अटक

पुणे : महसूल विभागातील कथित लाचखोरीच्या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत एका तलाठ्याला रंगेहाथ पकडले. संतोष राणे असे अटक करण्

इथेनॉल हे इंधनाला सर्वोत्तम पर्यायमाजी मंत्री थोरात ; थोरात कारखान्यातून दीड कोटी लिटर इथेनॉल निर्मिती
शेतकरी कर्जमाफीचे निकष बदलण्याचे संकेतकृषीमंत्री भरणे : तब्बल 56 लाख शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ
पुण्याच्या नवले पुलाखाली भरधाव टँकरचा थरारक स्टंट; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली


पुणे : महसूल विभागातील कथित लाचखोरीच्या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत एका तलाठ्याला रंगेहाथ पकडले. संतोष राणे असे अटक करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव असून, तो मुळशी तालुक्यातील मान गावात कार्यरत होता. विशेष म्हणजे, राणे हे पुण्यातील एका माजी आमदारांचे नातेवाईक असल्याची माहिती पुढे आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीच्या फेरफार नोंदीत तक्रारदार व त्यांच्या भावाचे नाव समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू होती. तसेच, भावंडांमध्ये झालेल्या हक्कसोड पत्राची सातबारा उतार्‍यावर नोंद करण्यासाठी तलाठी संतोष राणे यांनी पैशांची मागणी केल्याचा आरोप आहे. या कामासाठी सुरुवातीला एक लाख पंचवीस हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यापैकी एक लाख रुपये यापूर्वीच स्वीकारण्यात आले होते. उर्वरित पंचवीस हजार रुपयांसाठी वारंवार मागणी होत असल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर संबंधित तलाठ्याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर विभागाने सापळा रचला. मान येथील तलाठी कार्यालयात पंचवीस हजार रुपये स्वीकारताना संतोष राणे यांना अधिकार्‍यांनी रंगेहाथ पकडले. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सरकारी कार्यालयांमध्ये नागरिकांकडून बेकायदेशीर पैशांची मागणी करणार्‍यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशाराही विभागाकडून देण्यात आला आहे.

COMMENTS