Homeताज्या बातम्या

जंतर मंतरवर तरुणांचे आंदोलन तीव्र; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर कॉकरोच जनता पार्टी ठाम, सरकारच्या चर्चेच्या आवाहनाला नकार

नवी दिल्ली: जंतर मंतरवर तरुणांचे आंदोलन अजूनही सुरूच असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलकांकडून केली जात

तुकाराम मुंडे यांच्या धडक कारवाईची धास्ती; नांदेडच्या बाजारातून सुटे खाद्यतेल गायब, नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांचा हिशोब कोण घेणार?
घुले प्रकरण: घटनेदिवशी मी अन् गाडीही घरीच! सौरभ सोनवणेंनी आरोप फेटाळले, कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची तयारी
नशा ही तरुणाईच्या भविष्याला लागलेली कीड; पोलीस निरीक्षक गायकवाड यांचे प्रतिपादन, कर्जतमध्ये विशेष जनजागृती कार्यक्रम
Cockroach Janta Party stages protest, demands Dharmendra Pradhan's  resignation: 7 things you need to know | India News - The Indian Express

नवी दिल्ली: जंतर मंतरवर तरुणांचे आंदोलन अजूनही सुरूच असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलकांकडून केली जात आहे. जोपर्यंत राजीनामा होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा देण्यात आला आहे. दिल्लीत २० जुलै रोजी पोलिसांनी तरुणांवर केलेल्या लाठीचार्जनंतर देशभरात, तसेच महाराष्ट्रातही संतापाची लाट पसरली आहे.

दुसरीकडे सरकार चर्चेसाठी तयार असल्याचे सांगत असून कॉकरोच जनता पार्टीने (सीजेपी) चर्चेचे ठिकाण आणि वेळ निवडावी, आम्ही चर्चा करू, असे आवाहन मोदी सरकारकडून करण्यात आले आहे. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सोनम वांगचूक यांची केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी भेट घेतली असून सरकारचे त्यांच्याशी बोलणे सुरू आहे. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार कॉकरोच जनता पार्टीने जेपी नड्डा यांच्याशी चर्चा करण्यास थेट नकार दिला आहे.

तरुणांच्या भावनांवर स्वार होऊन राजकारण: गजेंद्र सिंह शेखावत

केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी या आंदोलनावर गंभीर आरोप केले आहेत. काही लोक तरुणांच्या भावनांवर स्वार होऊन आपला राजकीय फायदा करून घेत आहेत आणि आंदोलन भडकवण्याचे काम करत असल्याचा दावा त्यांनी केला. तरीही सरकार चर्चेसाठी सकारात्मक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दोषींना शिक्षेसाठी फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवणार: पंतप्रधान मोदी

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आंदोलनाची दखल घेत सोशल मीडियाद्वारे महत्त्वाची घोषणा केली आहे. नीट (NEET) पेपर लीकमधील दोषींना कडक शिक्षा व्हावी यासाठी सरकार हे प्रकरण ‘फास्ट ट्रॅक कोर्टात’ चालवणार असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, या घोषणेनंतरही सीजेपीने शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा पुनरोच्चार केला आहे, ज्यामुळे आता या आंदोलनाला कोणते वळण मिळते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

COMMENTS