दिलीप धारूरकर यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दिलीप धारूरकर यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली

मुंबई : ज्येष्ठ पत्रकार, संपादक तथा राज्याचे माजी माहिती आयुक्त दिलीप धारूरकर यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फ

कर्जत महामार्गावर दुचाकींचा अपघात
अजित पवारांना माफी मागणाऱ्यांनी पहिले आपल्या नेत्यांचे वक्तव्य तपासावे – सुरज चव्हाण 
राधानगरी धरणाचे सर्व्हिस गेट ओपन

मुंबई : ज्येष्ठ पत्रकार, संपादक तथा राज्याचे माजी माहिती आयुक्त दिलीप धारूरकर यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
तुरस्त्र व्यक्तिमत्त्व गमावले – मुख्यमंत्री
संदेशात शिंदे यांनी म्हटले की, परखड पत्रकार आणि विचारवंत असे चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व गमावले आहे. अभ्यासू पत्रकार, संपादक म्हणून धारुरकर यांनी आपला वेगळा ठसा उमटवला. स्तंभलेखक, उत्तम वक्ते म्हणून ते परिचित होते. राज्याचे माहिती आयुक्त म्हणून त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. एक चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व म्हणून धारुरकर स्मरणात राहतील. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

विदर्भात माहिती आयुक्त म्हणून अतिशय उत्कृष्ट काम केले – उपमुख्यमंत्री
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, माजी माहिती आयुक्त, ज्येष्ठ पत्रकार दिलीप धारूरकर यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. विदर्भात माहिती आयुक्त म्हणून त्यांनी अतिशय उत्कृष्ट काम केले आणि इतरही भागातील प्रलंबित प्रकरणे निकालात काढण्यासाठी मोठा पुढाकार त्यांनी त्यांच्या कार्यकाळात घेतला. राष्ट्रवादी विचारांना बळकटी देणारे मोठे लेखन कार्य त्यांनी केले. एक उत्तम संपादक, वैचारिक स्तंभलेखक म्हणून ते कायम स्मरणात राहतील.

COMMENTS