Homeताज्या बातम्या

परळी वैजनाथ बस स्थानक परिसर चिखलमय; आषाढी एकादशीच्या काळात प्रवासी व भाविक हैराण

परळी वै.: आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळी वैजनाथ येथे भाविक भक्तांची तसेच नागरिक व प्रवाशांची मोठी वर्दळ वा

अ‍ॅड. साळुंके यांनी वकिलीला दिली समाजकार्याची जोड; उद्योजक मानसिंग पवार यांचे गौरवोद्गार,
मुंबईसह घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; पुढील चार दिवस अनेक भागांत सतर्कतेचा इशारा
मुस्कान शेख व छाया पांचाळ प्रसुती दरम्यान मातामृत्यू प्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा! बीड जिल्हा रुग्णालयासमोर आंदोलन

परळी वै.: आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळी वैजनाथ येथे भाविक भक्तांची तसेच नागरिक व प्रवाशांची मोठी वर्दळ वाढली आहे. मात्र, बस स्थानक परिसरात सध्या सुरू असलेल्या नूतनीकरणाच्या कामामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

बस स्थानक परिसरात थोडासा जरी पाऊस पडला, तरी सर्वत्र चिखलाचे साम्राज्य निर्माण होत असून प्रवाशांना चिखलातून वाट काढतच बसस्थानकात प्रवेश करावा लागत आहे. या दुरवस्थेमुळे विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले तसेच बाहेरगावाहून दर्शनासाठी येणार्‍या भाविक भक्तांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

स्थानक परिसरात नूतनीकरणाचे काम सुरू असताना प्रवाशांच्या ये-जा करण्यासाठी तात्पुरती पर्यायी व स्वच्छ व्यवस्था करणे गरजेचे होते. मात्र प्रशासनाकडून व कंत्राटदाराकडून या प्राथमिक सुविधेकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याची भावना प्रवासी वर्गातून व्यक्त होत आहे. पावसाळ्यात चिखल आणि खड्यांमुळे परिसराची भयानक दुरवस्था झाली असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

परळी बस स्थानक परिसरातील चिखलाची समस्या तातडीने दूर करून प्रवाशांसाठी सुरक्षित व स्वच्छ मार्ग उपलब्ध करून द्यावा, तसेच कामाची जबाबदारी असलेल्या कंत्राटदाराने तात्काळ मुरुम टाकून योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवासी व भाविकांमधून केली जात आहे. संबंधित प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

COMMENTS