नगरमधील अंध दिव्यांग वापरणार…चक्क स्मार्ट मोबाईल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगरमधील अंध दिव्यांग वापरणार…चक्क स्मार्ट मोबाईल

अनामप्रेमने घेतला पुढाकार, 75 जणांना दिले प्रशिक्षण

अहमदनगर/प्रतिनिधी : अंध व्यक्तींना काहीही दिसत नसले तरी जिद्दीने ते आयुष्याची आव्हाने पेलतात. या त्यांच्या संघर्षात मदतीचे मिळणारे हात त्यांना नेहमीच

नगरच्या पाण्याची खानेसुमारी सुरू ; पाणी मोजण्यासाठी नेमली पुण्याची संस्था
कोपरगाव मतदार संघातील रस्ते व पुलांसाठी ३.८४ कोटी निधी मंजूर:आमदार आशुतोष काळे
राहुरीतील व्यापार्‍याला 23 लाख रूपयांना घातला गंडा

अहमदनगर/प्रतिनिधी : अंध व्यक्तींना काहीही दिसत नसले तरी जिद्दीने ते आयुष्याची आव्हाने पेलतात. या त्यांच्या संघर्षात मदतीचे मिळणारे हात त्यांना नेहमीच नव्याने आत्मविश्‍वास देऊन जातात. असाच नवा आत्मविश्‍वास नगरमधील 75 अंध दिव्यांगांना येथील अनामप्रेम संस्थेने दिला आहे. या अंध दिव्यांगांना चक्क स्मार्ट मोबाईल दिला असून, स्क्रीन रिडर सॉफ्टवेअरच्या मदतीने ते कसा वापरायचा, याचे प्रशिक्षणही दिले आहे. त्यामुळे आता नगरमधील अंध दिव्यांगही स्मार्ट फोनच्या माध्यमातून एकमेकांशी नियमित संपर्कासह जीवनोपयोगी माहितीची देवाण-घेवाणही करणार आहेत. दरम्यान, अंध व्यक्तींना स्मार्ट फोन वापरण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना तसे फोन देणारी नगरमधील ही घटना राज्यातील पहिलीच असल्याचे सांगितले जात आहे.
मागील एक वर्षारपासून अमेझॉन कंपनीच्या माध्यमातून अनामप्रेम सोबत स्मार्ट फोन मोबाईल वाटप करण्याचे नियोजन सुरू होते. शेकडो दिव्यांगांच्या मुलाखती घेऊन अनामप्रेमच्या माध्यमातून गरजू व शिक्षण घेणारे दिव्यांग निवडले व 75 अंध दिव्यांगांनाफोन वितरित करण्यात आले. यावेळी अनामप्रेम संस्थेचे अभियंता अजित माने, अजित कुलकर्णी, अभय रायकवाड, दीपक बुरम, डॉ.मेघना मराठे, जे.आर.मंत्री तसेच अमेझॉन कंपनीचे संजय पंजाबी, रुपेश पांडे, हेटल परमार उपस्थित होते. प्रास्ताविक माने यांनी केले. ते म्हणाले की, अनामप्रेम संस्था मागील 17 वर्षांपासून दिव्यांग पुनर्वसनाचे काम करीत आहे. स्मार्ट फोन वितरणामुळे अनेक दिव्यांगांची शिक्षण घेण्याची सोय झाली आहे. त्यांना शिक्षणात रुची निर्माण झाली आहे. अनामप्रेमने मुंबई उच्च न्यायालय येथे ऑनलाइन शिक्षण सर्व दिव्यांग यांना मिळावे म्हणून जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेचा निकाल अद्याप येणे बाकी आहे. तत्पूर्वी निवडक गरजू अंध दिव्यांगांसाठी हा स्मार्ट फोन वितरण कार्यक्रम अनामप्रेम ने आयोजित केला, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
स्मार्ट फोन वितरण करण्यासाठी विष्णू वारकरी, उमेश पंडुरे, प्रतीक्षा मुनतोडे, विलास शिंदे, अमृत भुसारी यांची समिती नेमण्यात आली होती. मुलाखत व कागदपत्रे यांची पडताळणी करून अभय रायकवाड, डॉ.मेघना मराठे यांच्या समितीने राज्यातील अंध, अपंगांची या स्मार्ट फोनकरिता निवड मुलाखती घेऊन करण्यात आली. पहिल्या टप्प्यात 75 दिव्यांग यांना मोबाईल वाटप करण्यात आले असून तब्बल 1 हजारावर अंध दिव्यांगांना दुसर्‍या टप्प्यात निवड चाचणी घेऊन स्मार्ट फोन दिला जाणार आहे. त्यासाठी दानशुरांची मदत घेतली जाणार आहे. या उपक्रमास मदत करू इच्छिणारांनी 9422224386 यावर संपर्क साधावा.

दिव्यागांच्या शिक्षणात डिजिटल साधने क्रांतिकारक आहेत. स्मार्ट फोन जर दिव्यांगांना मिळाले तर त्यांचे शिक्षण सहज सुलभ होईल. आजच्या इंटरनेटच्या काळात जगाबरोबर दिव्यांग देखील चालले पाहिजेत. अनामप्रेम च्या स्मार्ट फोन वितरणाला अमेझॉन कंपनीने मदत करण्यात समाधान वाटले. या स्मार्ट फोनने अनेक दिव्यांगांना शिक्षण घेणे, अभ्यास करणे सोपे जाणार आहे.
-स्नेहा राठोड, संचालक, अमेझॉन कंपनी (भरती विभाग)

COMMENTS