पाठलाग करून हनीट्रॅपचा आरोपी जेरबंद

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाठलाग करून हनीट्रॅपचा आरोपी जेरबंद

नगर तालुक्यातील जखणगाव येथे घडलेल्या तीन कोटी रुपयांच्या हनी ट्रॅप प्रकरणाच्यासंदर्भात फरार असलेला आरोपी महेश बागले (रा. नालेगाव) याला रविवारी नगर तालुका पोलिसांनी शहा डोंगरावर पाठलाग करून शिताफीने पकडले. दरम्यान, नगर तालुका पोलिस ठाण्यामध्ये या प्रकरणाचे 2 गुन्हे दाखल आहेत.

माळीबाभूळगाव येथील ग्रामपंचायत सदस्य गणेश वायकर यांच्यासह तरुणांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
कर्जतमध्ये लाकडाची अवैध वाहतूक करणारे पीकअप पकडले
नगरला पाणी येईल हो .. पण, फेज टू विलंबाचे काय ? l Lok News24

अहमदनगर/प्रतिनिधी – नगर तालुक्यातील जखणगाव येथे घडलेल्या तीन कोटी रुपयांच्या हनी ट्रॅप प्रकरणाच्यासंदर्भात फरार असलेला आरोपी महेश बागले (रा. नालेगाव) याला रविवारी नगर तालुका पोलिसांनी शहा डोंगरावर पाठलाग करून शिताफीने पकडले. दरम्यान, नगर तालुका पोलिस ठाण्यामध्ये या प्रकरणाचे 2 गुन्हे दाखल आहेत. त्यातील हा एक आरोपी सापडला असून, आणखी एक जण फरार आहे. 

    नगर तालुका पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या हॅनी ट्रॅपशी संबंधित दोन प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. त्यापैकी एका गुन्ह्यात एका क्लासवन अधिकार्‍याला तीन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी एका महिलेसह तिचा साथीदार अमोल मोरे याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. या प्रकरणामध्ये असलेले आरोपी बागले व खरमाळे हे दोनजण फरार होते. यापैकी बागले हा रविवारी नगर तालुक्यातील शहा डोंगर परिसरात एका लग्नासाठी येणार असल्याची माहिती नगर तालुका पोलिसांना मिळाल्यानंतर तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या पथकाने त्याठिकाणी सापळा रचला. पण तेथे पोलिसांना पाहताच तो पळू लागल्याने त्याचा पाठलाग करून त्याला अटक केली आहे. नगर तालुक्यातील जखणगाव हनी ट्रॅपचा विषय सध्या सर्वत्र गाजत आहे. सुरुवातीला एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी एक महिला व कायनेटिक चौक परिसरात राहणारा अमोल मोरे या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणामध्ये त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. या गुन्ह्याचा तपास करताना नगर तालुका पोलिस ठाण्यांमध्ये तीन कोटी रुपयांची खंडणी एका अधिकार्‍याला मागितल्याप्रकरणी आणखी एक असाच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुसर्‍या प्रकरणामध्ये संबंधित महिला व मोरे यांना वर्ग करण्यासाठी न्यायालयामध्ये पोलिसांनी अर्जही दाखल केला आहे. पण सात दिवसांचा क्वारंटाइन कालावधी असल्यामुळे तो संपल्यानंतर त्यांना तीन कोटी रुपयांच्या गुन्ह्यांमध्ये वर्ग केले जाणार आहे. तसेच, तीन कोटी रुपयांच्या गुन्ह्यात आता बागले अटक केल्यानंतर या घटनेचा उलगडा आता होणार आहे.

पहिले दोषारोपपत्र तयार

या संदर्भामध्ये नगर तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र सानप यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, आमच्याकडे हनीट्रॅपसंदर्भातील असलेल्या पहिल्या गुन्ह्याचा तपास पूर्णत्वाकडे गेलेला आहे. जे आरोपी पहिल्या गुन्ह्यामध्ये अटक झालेले आहेत, त्यांना आता दुसर्‍या गुन्ह्यामध्ये वर्ग केले जाणार आहे. या प्रकरणाची अन्य माहितीसुद्धा पोलिस घेत असल्याचे त्यांनी सांगितले. पहिल्या गुन्ह्याच्या संदर्भातील दोषारोपपत्र येत्या आठ दिवसांमध्ये न्यायालयामध्ये दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

COMMENTS