Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

थोरात महाविद्यालयातील 4 विद्यार्थिनींची पोलिस दलात निवड

संगमनेर/प्रतिनिधी ः आपल्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वागीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी काम करणार्‍या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरा

कोरोना काळात गरीबांसाठीच्या धान्याचे नगरला होत होते पीठ ; अटक केलेल्या आठ आरोपींना पोलिस कोठडी
कर्जतमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग
कृषी विकास अधिकारी शंकर किरवे यांच्या संपत्तीची चौकशी करून कारवाई करा

संगमनेर/प्रतिनिधी ः आपल्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वागीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी काम करणार्‍या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील 4 विद्यार्थिनींची महाराष्ट्र पोलीस विभागामध्ये निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. दिनानाथ पाटील यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना डॉ. दिनानाथ पाटील म्हणाले की, महाविद्यालयात विद्यार्थ्यासाठी स्पर्धा परीक्षा विभाग व करिअर कट्टा उपक्रमाच्या माध्यमातून सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शैक्षणिक वातावरण, उच्च विद्या विभूषित प्राध्यापक व गुणवत्ता यामुळे विद्यार्थ्यांना स्वतः च्या करिअर निर्मितीची मोठी संधी मिळत आहे. यावर्षी राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थिनी कोकणे प्रिया चंद्रभान हिची ठाणे ग्रामीण पोलिस चालक पदी, पवार पुजा देविदास हिची नवी मुंबई पोलीस पदी तर भूगोल विभागातील विद्यार्थिनी पानसरे पुजा रामनाथ हिंदी मुंबई रेल्वे पोलीस दलामध्ये नियुक्ती झाली आहे. या विद्यार्थिनींनी महाविद्यालयाच्या अभ्यासिकेत बसून मोठ्या जिद्दीने, कष्टाने व प्रामाणिकपणे अभ्यास करून यश मिळविले आहे. या तीनही विद्यार्थिनींनी महाविद्यालयीन शिक्षणाला कष्टाची व जिद्दीची जोड देवून यश प्राप्त केले. त्यांच्या यशाबद्दल राज्याचे माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेव थोरात, संस्थेचे चेअरमन मा. आ डॉ. सुधीर तांबे, आमदार  सत्यजित तांबे,  सौ. दुर्गाताई तांबे,.डॉ.जयश्रीताई थोरात, संस्थेचे सचिव  लक्ष्मणराव कुटे, सहसचिव  दत्तात्रय चासकर, रजिस्ट्रार  बाबुराव गवांदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिनानाथ पाटील, उपप्राचार्य प्रा. शिवाजी नवले, उपप्राचार्य प्रा. डॉ. बाळासाहेब वाघ, नॅक समन्वयक प्रा. लक्ष्मण घायवट, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. जयराम डेरे, राष्ट्रीय छात्र सेना प्रमुख डॉ. शोभा रहाणे, कार्यालय अधिक्षक गोरक्षनाथ पानसरे, सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर सेवक वर्ग आणि विद्यार्थी आदींनी अभिनंदन केले आहे.

COMMENTS