Homeताज्या बातम्या

दिल्लीत ‘कॉकरोच जनता पार्टी’चे आंदोलन हिंसक; पोलिसांवर हल्ला, इंटरनेट सेवा बंद, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी संसदेवर मोर्चाचा प्रयत्न

नवी दिल्ली: नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर मंतरवर कॉकरोच

अतिक्रमण हटाव मोहिमेला अडथळा करणार्‍यांवर गुन्हे दाखल करा; बीड शहर बचाव मंचाची मागणी
आसूड मोर्चातून काँग्रेसचा सरकारविरोधात हल्लाबोल; नांदेडमध्ये तिन्ही जिल्हाध्यक्षांनी स्वीकारला पदभार
वयाच्या पंचाहत्तरीतही ‘हरित तपस्या’! सातारा डोंगराच्या कुशीत बीज पेरणारा सेवानिवृत्त शिक्षक; पर्यावरणासाठी अविरत साधना
Several hurt in crackdown on CJP Parliament march - The Hindu

नवी दिल्ली: नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीने पुकारलेल्या आंदोलनाला आता हिंसक वळण लागले आहे. मोठ्या संख्येने विद्यार्थी दिल्लीत दाखल झाले असून, काल रात्री आंदोलकांनी पोलिसांवर टार्गेट करत हल्ला केल्याने काही पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत.

संसदेवर मोर्चाचा प्रयत्न आणि पोलिसांवर हल्ले सध्या देशाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून, संसद परिसरात आधीच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र, आंदोलकांनी थेट संसदेवर मोर्चा नेण्याचा प्रयत्न केल्याने तणाव प्रचंड वाढला आहे. कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते कोणत्याही परिस्थितीत शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यावर ठाम आहेत. पोलिसांवर जाणीवपूर्वक हल्ले केले जात असून, ‘बांगलादेशमध्ये जे घडले तेच येथेही होईल’, अशी चिथावणीखोर भाषा काही आंदोलकांकडून वापरली जात असल्याने या आंदोलनाच्या स्वरूपावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

भडकावू व्हिडीओ रोखण्यासाठी दिल्लीत इंटरनेट सेवा खंडित जंतर मंतरवर वाढणारी आंदोलकांची गर्दी प्रशासनाची मोठी डोकेदुखी ठरत आहे. त्यातच पाकिस्तानच्या काही सोशल मीडिया अकाऊंटवरून तरुणांची माथी भडकवणारे व्हिडीओ व्हायरल केले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोणत्याही प्रकारचे भडकावू भाषण आणि व्हिडीओ पसरू नयेत, यासाठी दिल्लीतील इंटरनेट सेवा तातडीने बंद करण्याचा मोठा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सध्या दिल्लीत पोलीस आणि इतर सर्व सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत.

सरकारवर राजीनाम्यासाठी वाढता दबाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीट पेपरफुटीचे प्रकरण फास्ट-ट्रॅक कोर्टात चालवले जाईल, असे स्पष्ट करूनही आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. या हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या निवासस्थानाच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. इंटरनेट बंदी आणि वाढत्या तणावामुळे राजधानीतील परिस्थिती गंभीर बनली असून, सरकारवर राजीनाम्यासाठी दबाव वाढत आहे.

COMMENTS