भोकर शहरात भरदिवसा स्कुटीच्या डिकीत ठेवलेली 1 लाख 60 हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना गुरुवार (दि. 16 जुलै) रोजी घडली. या
भोकर शहरात भरदिवसा स्कुटीच्या डिकीत ठेवलेली 1 लाख 60 हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना गुरुवार (दि. 16 जुलै) रोजी घडली. या घटनेमुळे शहरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
माहितीनुसार, सटवाजी पाटील कृषी व तंत्रनिकेतन विद्यालयाचे कर्मचारी वायुजीत सुरेशराव कदम यांनी भोकर येथील मुख्य रस्त्यावरील बँक ऑफ बडोदा शाखेतून 1 लाख 60 हजार रुपयांची रोकड काढली. त्यांनी ही रक्कम त्यांच्या स्कुटी (क्र. एमएच-26 डीसी-3442) च्या डिकीत ठेवली. त्यानंतर ते मोंढा परिसरातील शंकर नागरी बँकेसमोर स्कुटी उभी करून बँकेतील कामासाठी गेले. याच दरम्यान दुपारी सुमारे 1 ते 1.30 वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी स्कुटीची डिकी उघडून त्यातील संपूर्ण रोकड चोरून नेली. कृषी विद्यालयात परतल्यानंतर वायुजीत कदम यांनी स्कुटीची डिकी उघडली असता त्यामधील रोकड गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ भोकर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

COMMENTS