Homeताज्या बातम्या

यशवंत महाविद्यालयातील अल्पवयीन बालकाला अपहरण करून लुटले

नांदेड : यशवंत महाविद्यालयाच्या परिसरातून एका अल्पवयीन बालकाचे अपहरण करून त्याला मारहाण करत लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी या मु

बीडमध्ये उपवर्गीकरण विरोधात आंबेडकरी समाजाचा महामोर्चाभाजप सरकारने जाती-जातीत भांडणे लावू नयेत;11 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा
कर्जत तालुक्यातील राशीनमध्ये वादळी वाऱ्यामुळे अनधिकृत होर्डिंग कोसळून २४ वर्षीय तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू; दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
महापालिकेतील ‘अग्रीम’ संस्कृतीला धनराज पांडे यांचा लगाम; कोट्यवधींच्या प्रलंबित रकमेच्या वसुलीला वेग


नांदेड : यशवंत महाविद्यालयाच्या परिसरातून एका अल्पवयीन बालकाचे अपहरण करून त्याला मारहाण करत लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी या मुलाला धमकावून त्याच्याकडून रोख रक्कम आणि ऑनलाईन पद्धतीने एकूण 6 हजार 633 रुपये जबरदस्तीने काढून घेतले आहेत.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 18 जुलै 2026 रोजी दुपारी 12:30 ते 2:30 च्या सुमारास घडली. फिर्यादी अल्पवयीन बालक हा यशवंत महाविद्यालयात इयत्ता 11 वी मध्ये शिक्षण घेत आहे. शनिवारी दुपारी तो महाविद्यालयाच्या लायब्ररीतून बाहेर पडत असताना, काळ्या रंगाच्या स्प्लेंडर मोटार सायकलवर आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी त्याला अडविले. आम्हाला टी.सी. काढायची आहे, आमच्यासोबत चल असे सांगून त्यांनी या बालकाला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून एका निर्जन ठिकाणी नेले.त्या ठिकाणी आधीच उपस्थित असलेल्या इतर दोन साथीदारांसह मिळून या चौघांनी अल्पवयीन बालकाला बेदम मारहाण केली. आरोपींनी त्याच्या जवळील मोबाईल हिसकावून घेतला आणि फोन पे द्वारे 6 हजार 633 रुपये एका अज्ञात व्यक्तीच्या मोबाईल क्रमांकावर जबरदस्तीने ट्रान्सफर करून घेतले. इतकेच नव्हे तर, त्या बालकाच्या खिशातील 500 रुपये रोख देखील काढून घेण्यात आले.याप्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात चार अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बी.एन.एस.) 2023 च्या कलम 309(6), 137(2) आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय विनोद देशमुख या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

COMMENTS