Homeताज्या बातम्यासंपादकीय

महाराष्ट्रातील राजकारणाची खिचडी

भारतीयांच्या आहरातील खिचडी आणि महाराष्ट्राच्या राजकारणात तयार झालेली राजकीय खिचडी दोन्हींचे भिन्न अर्थ निघतात. जेवणातील खिचडी रूचकर असते, पचायला

अंबानी, अदानी आणि राजकारण
दाभोळकर हत्या तपास आणि न्याय
संपत्तीचा हव्यास

भारतीयांच्या आहरातील खिचडी आणि महाराष्ट्राच्या राजकारणात तयार झालेली राजकीय खिचडी दोन्हींचे भिन्न अर्थ निघतात. जेवणातील खिचडी रूचकर असते, पचायला हलकी असते, भारतीय संस्कृतीत खिचडी हा साधारण पदार्थ समजला जातो. बहुधा साधे जेवण हवे असेल तेव्हा किंवा रात्रीच्या जेवणासाठी करतात. पचायला सोपी असल्याने लहान मुले आणि आजारी व्यक्तींसाथी खिचडी चांगला आहार समजली जाते.. खिचडी हा शब्द मराठी भाषेत अनपेक्षित घटकांच्या अथवा व्यक्तींच्या एकत्र येण्यास उपहासाने वापरला जातो. त्यामुळेच आम्ही महाराष्ट्राच्या राजकारणातील खिचडी जी झाली आहे, त्या अर्थाने हा शब्द वापरला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील खिचडी जनता मतदानाद्वारे कशी पचवते, याचे उत्तर 4 जून रोजीच मिळणार आहे. वास्तविक पाहता महाराष्ट्रात प्रमुख सहा पक्ष दिसून येतात. काँगे्रस आणि भाजप प्रमुख पक्ष असून, शिवसेनेतून उभी फूट पडल्यानंतर त्यांच्यातून निर्माण झालेले दोन पक्ष आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून उभी फूट पडून निर्माण झालेले दोन असे एकूण सहा पक्षाची महाराष्ट्रात राजकीय खिचडी पकवण्याचा बेत सुरू आहे. दोन्ही गटांमध्ये तीन-तीन पक्षांचा समावेश आहे. त्यात एक सत्ताधारी एक आहे, तर दुसरा विरोधी गट आहे. त्यामुळे सत्ताधार्‍यांची खिचडी शिजते की, विरोधक सत्ताधार्‍यांची खिचडी शिजू देत नाही, याचा निकाल 4 जून रोजीच बघायला मिळणार आहे.
महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपांचा घोळ मतदानांचा दुसरा टप्पा संपल्यानंतरही सुटला नव्हता. मात्र काही तासांपूर्वी महायुतीतील जागा वाटपांचा घोळ संपुष्टात आला आहे. आता महायुतीमध्ये केवळ पालघरच्या जागेवरून कोण लढणार हा प्रश्‍न अनुत्तरित आहे. शिंदे यांच्या शिवसेनेने तब्बल 15 जागा आपल्या पदरात पाडून घेत आपले महत्व अधोरेखित केले असले तरी, या 15 जागांपैकी किती जागा जिंकून येणार, यावरच त्यांचे राजकीय महत्व अधोरेखित होणार आहे. नाशिक, कल्याण, ठाणे आणि संभाजीनगरच्या जागा कोण लढवणार यासाठी बरेच दिवस काथ्याकुट सुरू होते. नाशिकच्या जागेवर तर राष्ट्रवादीने दावा सांगत छगन भुजबळ यांना या जागेवर उभे करण्याचे मनसुबे रचण्यात येत होते. शिवाय भुजबळांना केंद्रातून देखील ग्रीन सिग्नल होता, त्यामुळेच भाजपचे नेते अमित शहा यांनी भुजबळांना राजधानीत बोलावून चर्चा केली होती. मात्र शेवटी ही जागा शिंदे गटाला सोडण्यात आली. शिवाय या जागेवरून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. यासोबतच कल्याण मतदारसंघातील जागा नेमके कोण लढणार यावर देखील बराच खल सुरू होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही जागा श्रीकांत शिंदे लढतील असे घोषित केले होते, मात्र त्यांच्या पक्षाकडून ही जागा घोषित करण्यास बराच विलंब लावला. अखेर ही जागा आणि ठाण्याची जागा देखील शिंदे आपल्या गटात पाडून घेण्यास यशस्वी ठरले आहे. वास्तविक पाहता भाजप आणि काँगे्रस हा राष्ट्रीय पक्ष असला तरी, त्यांचे किती सीट निवडून येतात, याला महत्व असणार आहेच. मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात जी पक्षफुटी झाली, त्या संघर्षात कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष असणार आहे. शरद पवार की अजित पवार, उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे यापैकी कुणाचे पारडे जड ठरते, ते आगामी लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट होणार आहे, यात कोणतीही शंका नाही. शिवाय या निकालामुळे जे पारडे जड ठरेल त्या पारड्याला विधानसभा निवडणुकीत मोठा फायदा होणार आहे, यात शंका नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात जी खिचडी शिजवणार्‍यांनी शिजवून ठेवली, ती खिचडी स्वीकारायची की नाही, याचा फैसला 4 जून रोजीच होणार आहे. त्यानंतरच महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेत्यांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे.

COMMENTS