Homeताज्या बातम्या

पुण्यात जनगणना करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला मारहाण; पालिका आयुक्तांचे पोलिसांना कारवाईचे निर्देश

पुणे : पुण्यात जनगणनेचे काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महापालिका आयुक्तांनी या प्रकरणाची गंभीर

अकोले तालुक्यात जनगणनेसाठी प्रशासन सज्ज४५८ प्रगणक व ६९ पर्यवेक्षकांना प्रशिक्षण; डिजिटल पद्धतीने जनगणना
मी सहभागी झाले, आपणही जनगणनेत सहभागी व्हानगराध्यक्षा प्रेमलताताई पारवे यांचे आवाहन
कर्जत तालुक्यात डिजिटल जनगणनेस प्रारंभ
Pune crime : पुण्यात जनगणना करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला मारहाण; गुन्हा दाखल  Pune Marathi News | Pune crime Female census worker beaten up in Pune; case  registered | Latest Pune News at Lokmat.com

पुणे : पुण्यात जनगणनेचे काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महापालिका आयुक्तांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, त्यांनी पोलिसांना पत्र लिहून हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

देशासह राज्यात सध्या जनगणनेचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या मोहिमेसाठी शिक्षकांसह विविध सरकारी कार्यालयांतील कर्मचारी ‘प्रगणक’ म्हणून घरोघरी जाऊन माहिती गोळा करत आहेत. मात्र, हे कर्मचारी नक्की कोणते काम करत आहेत आणि ही माहिती कशासाठी घेतली जात आहे, याची स्पष्ट कल्पना नसल्यामुळे अनेक ठिकाणी या कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. अशातच पुण्यात महिला कर्मचाऱ्याला झालेल्या मारहाणीमुळे प्रगणकांमध्ये संतापाचे आणि चिंतेचे वातावरण आहे.

COMMENTS