Homeताज्या बातम्या

राष्ट्रीय महामार्गावर चार रानडुकरांचा मृत्यू; अपघात की शिकार? चर्चांना उधाणदोन मृतदेह गायब, उर्वरित दोन सडल्याने दुर्गंधी; वन विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

माहूर-धनोडा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161एवरील श्री रेणुका देवी महाविद्यालय ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंता कार्यालयादरम्यान र

धुळे जिल्ह्यात कापूस पीकविमा रखडला; सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी शिरपूर फर्स्टचे अनोखे आंदोलन
पुण्यात हिंदू जनआक्रोश मोर्चा दरम्यान तणाव; काय आहे परिस्थिती?
कृत्रिम बुद्धिमत्ता, मानवी संवेदना आणि पारंपरिक ज्ञानाच्या समन्वयातून पशुपालनात भरभराट आणा : पंकजा मुंडेएकात्मिक दुग्धव्यवसाय विकास उपक्रमाचे उद्घाटन; शेतकर्‍यांच्या उत्पन्नवाढीस चालना



माहूर-धनोडा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161एवरील श्री रेणुका देवी महाविद्यालय ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंता कार्यालयादरम्यान रस्त्याच्या कडेला तीन ते चार दिवसांपूर्वी चार रानडुकरे मृतावस्थेत आढळून आली होती. मात्र, त्यापैकी दोन रानडुकरांचे मृतदेह अचानक गायब झाले असून उर्वरित दोन मृतदेह सडल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून या घटनेमागे अपघात की शिकारीचा प्रकार आहे, याबाबत शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे.
मृत रानडुकरे डम्पिंग ग्राउंडकडे जाणार्‍या रस्त्यालगत पडून असल्याचे नागरिकांनी सांगितले. मात्र, तीन दिवस उलटूनही त्यांची विल्हेवाट लावण्यात आलेली नसल्याने वन विभागाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. यापूर्वीही माहूर तालुक्यातील जंगल परिसरात आणि पाणवठ्यांजवळ उन्हाळ्यात पाण्याअभावी रानडुकरे, ससे, कोल्हे आदी वन्यप्राण्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या होत्या. त्या वेळीही वन विभागाने पुरेशी दखल घेतली नसल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात आला होता. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावर मृतावस्थेत आढळलेल्या चार रानडुकरांचा मृत्यू वाहनाच्या धडकेत झाला की त्यांची शिकार करण्यात आली, याचा सखोल तपास करून सत्य समोर आणावे, तसेच उर्वरित मृतदेह तातडीने हटवून परिसर स्वच्छ करावा, अशी मागणी वाहनधारक व नागरिकांकडून करण्यात येत आहे.

COMMENTS