Homeताज्या बातम्या

पेपरफुटीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे बीडमध्ये धरणे आंदोलन; धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा- राजेंद्र मस्के

बीड: युवक आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी दिवस-रात्र परिश्रम घेत आहेत. मात्र सातत्याने घडणार्‍या पेपरफुटीच्या घटना, परीक्षा रद्द होणे, भरती प्रक्रिये

पाटोदा तालुक्यातील चिंचोली जिल्हा परिषद शाळेची भिंत वर्ष उलटूनही दुरुस्त नाही; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
माजलगाव तालुक्यातील सुलतानपूर जि. प. शाळेची इमारत दुरवस्थेत; स्वच्छतागृहाचा अभाव असल्याने विद्यार्थ्यांचे हाल
कुंडलवाडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

बीड: युवक आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी दिवस-रात्र परिश्रम घेत आहेत. मात्र सातत्याने घडणार्‍या पेपरफुटीच्या घटना, परीक्षा रद्द होणे, भरती प्रक्रियेतील विलंब आणि शिक्षण व्यवस्थेतील वाढता भ्रष्टाचार यामुळे विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरत असून त्यांच्या भविष्यासमोर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या सर्व घटनांची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी ठाम मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केली.

पेपरफुटीच्या घटनांनंतर युवकांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू केलेल्या आंदोलनाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. तरीही केंद्र सरकारकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात प्रदेश पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, महिला आघाडी, विद्यार्थी आघाडी, पक्षाचे कार्यकर्ते तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आंदोलनानंतर आंदोलनकर्त्यांच्या वतीने जिल्हाधिकारी, बीड यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनामध्ये केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच शिक्षण व्यवस्था पारदर्शक, विश्वासार्ह आणि विद्यार्थीकेंद्रित करण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना राबविण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली.

युवकांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि शिक्षण व्यवस्थेतील गंभीर त्रुटींकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी पेपरफुटीच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व व्यावसायिक भविष्य धोक्यात आल्याची तीव्र खंत व्यक्त केली. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार, परीक्षा प्रक्रियेतील अनियमितता आणि युवकांवरील अन्यायाविरोधात उपस्थितांनी तीव्र संताप व्यक्त केला. युवक आणि विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा संघर्ष यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

COMMENTS