Homeताज्या बातम्यादेश

जनरल नरवणेंचे अप्रकाशित पुस्तक लीक

दिल्ली पोलिसांकडून गुन्हा दाखल करत तपास सुरूनवी दिल्ली : माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणेंचे ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ हे अद्याप अधिकृतरीत्या प्रक

आजचे राशीचक्र शनिवार, १६ ऑक्टोबर २०२१ अवश्य पहा
बिहारमध्ये 75 टक्के आरक्षण मंजूर
नवदाम्पत्याने विष प्राशन करून आत्महत्या

दिल्ली पोलिसांकडून गुन्हा दाखल करत तपास सुरू
नवी दिल्ली : माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणेंचे ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ हे अद्याप अधिकृतरीत्या प्रकाशित न झालेले पुस्तक सोशल मीडियावर प्रसारित झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाची दखल घेत दिल्ली पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. संबंधित पुस्तकाला प्रकाशनासाठी आवश्यक अधिकृत परवानगी अद्याप मिळालेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स तसेच ऑनलाइन न्यूज फोरमवर या पुस्तकाची प्री-प्रिंट आवृत्ती उपलब्ध असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. या पार्श्‍वभूमीवर प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली. तपासादरम्यान ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ या नावाची टायपसेट केलेली पीडीएफ प्रत काही संकेतस्थळांवर अपलोड करण्यात आल्याचे आढळून आले आहे. ही पीडीएफ प्रत कथितपणे पेंग्विन रँडम हाऊस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडकडून तयार करण्यात आली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, काही ऑनलाइन मार्केटिंग प्लॅटफॉर्मवर या पुस्तकाचे अंतिम मुखपृष्ठही प्रदर्शित करण्यात आले होते, जणू काही हे पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध आहे, असे भासवण्यात आले होते. हा प्रकार पुस्तकाच्या संभाव्य लीक, गोपनीयतेच्या उल्लंघनासह कॉपीराइट नियमांच्या भंगाशी संबंधित असू शकतो, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

COMMENTS