Homeताज्या बातम्या

गेवराई आगाराच्या ताफ्यात पाच नवीन ’राजमाता जिजाऊ’ बसेस दाखलआ. विजयसिंह पंडित यांच्या हस्ते पाच बसेसचे झाले लोकार्पण

गेवराई आगाराच्या ताफ्यात 3÷2 आसन रचनेच्या पाच नवीन, अत्याधुनिक ’राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल झाल्या असून, शनिवारी आ. विजयसिंह पंडित यांच्यासह ईतर मान

24 तासांत खुलासा करा, अन्यथा अपात्रतेची कारवाईठाकरे गटाचा सहा खासदारांना स्पष्टीकरण देण्याचा इशारा
नायगाव तालुक्यातील पाच महसूल मंडळांत दमदार भिज पाऊसकरपून जाणार्‍या पिकांना जीवदान शेतकर्‍यात समाधानाचे वातावरण निर्माण
एसआयआर 2026 मोहिमेत नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा; प्रा. सय्यद शफीक हाश्मी यांचे आवाहनअचूक मतदार यादीसाठी बीएलओंना सहकार्य करा; बुंदेलपुरा येथील जनजागृती कार्यक्रमात नागरिकांना मार्गदर्शन



गेवराई आगाराच्या ताफ्यात 3÷2 आसन रचनेच्या पाच नवीन, अत्याधुनिक ’राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल झाल्या असून, शनिवारी आ. विजयसिंह पंडित यांच्यासह ईतर मान्यवरांच्या उपस्थितीत या बसेसचे विधिवत पूजन करून प्रवाशांच्या सेवेसाठी लोकार्पण करण्यात आले.
यावेळी बोलताना आ. विजयसिंह पंडित म्हणाले की, राज्याचे परिवहन मंत्री मा. प्रताप सरनाईक यांच्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याने या नवीन बसेस गेवराई आगाराला उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे लांब पल्ल्याच्या तसेच ग्रामीण भागातील प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार बससेवा मिळणार आहे. सध्या गेवराई आगारातून मुंबई, पुणे, कल्याण, सोलापूर, पंढरपूर आदी मार्गांवर बससेवा सुरू आहे. नव्याने दाखल झालेल्या पाच बसेसमुळे या मार्गांवरील सेवा अधिक सक्षम होणार असून, ग्रामीण भागातील अनेक मार्गांवरही नव्या बसफेर्‍या सुरू करण्यास मदत होणार आहे.यावेळी ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे प्रगतिपथावर असून मागील काळात रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे बंद झालेल्या बसफेर्‍या पुन्हा सुरू करण्याच्या सूचनाही संबंधित अधिकार्‍यांना देण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.   या उपक्रमामुळे गेवराई तालुक्यातील नागरिकांना अधिक दर्जेदार, सुरक्षित आणि वेळेवर सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. यावेळी अधिकारी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS